मुंबई : १ मार्च पासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून म्हणजेच अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक प्रकारच्या टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर केल्या होत्या.
या सर्व टीकेची परतफेड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या भाषणात व्याजासकट केलेली आहे असे म्हणले तर अतिशयोक्तीठ रणार नाही. सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणबाजीवर तर मुख्यमंत्र्यांनी थेट नटसम्राट नाटकाची आठवण झाल्याचा टोला लगावला. त्याचबरोबर सीमा भाग, मराठी भाषा दिन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरुनही मुख्यमंत्र्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे.
विरोधकांची चर्चा ऐकून नटसम्राट पाहिल्याचा भास झाल्याचा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. मुनगंटीवारांच्या भाषणादरम्यान नटसम्राटमधील मी अथ्थेलो, मी आहे हॅम्लेट असा भास झाला. पण शेवटी कुणी किंमत देतं का किंमत अशी स्थिती असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुनगंटीवार यांच्या भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भीती वाटत होती, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. त्याचबरोबर मी आणि मुनगंटीवार हाडाचे कलाकार आहोत. पण कलेला राजकारणात वाव नाही. मात्र, मुनगंटीवार यांना संधी मिळाली की त्यांची कला उफाळून येते. पण सुधीरभाऊ तुमच्यातला कलाकार मारु नका, अशा खोचक सल्लाही मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवारांना दिला आहे.
दरम्यान यावेळी काही सदस्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा एकरी उल्लेख केला यामुळे ठाकरे यांनी त्याचं भाषण काही काळ थांबवल होत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली, ‘उद्धव ठाकरे हे विशिष्ट पक्षाचे जरी असले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री पद हे सन्मानीय पद आहे यामुळे जर कोणी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.’ असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होऊ देणार नाही; ठाकरेंनी भाजपला ठणकावलं
- ‘तो दिवस दूर नाही…जेव्हा मोदीजी बाहेरून स्टेशन बघायचे देखील पैसे घेतील’
- मुख्यमंत्र्यांच्या भाषणात विरोधकांचा गोंधळ, एकेरी उल्लेखावरुन देवेंद्र फडणवीसांची दिलगिरी
- दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणारा गजाआड
- महिला न्यायाधीशाला मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे वकिलाला पडले महागात; थेट तुरुंगात झाली रवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
