मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकरी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरुन सध्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना वारंवार समीर वानखेडे यांच्यावर टीका करत रोज नवनविन खुलासे करत आहे. या सर्व प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिकांंसारखी लोक मी खिशात ठेवतो, असं वक्तव्य केलं आहे.
मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीसह भाजपवर सडकून टीका केली. यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यासारखे लोक मी खिशात ठेवतो, असं वक्तव्य केलं आहे.
मला एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडला आहे की, एवढा यांना शाहरूख खानच्या मुलाचा पुळका का आला? म्हणजे नवाब मलिक रोज काहीतरी त्यावर म्हणणार, मग महाराष्ट्र सरकार आता काय सर्वोच्च न्यायालयात जाणार. महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार तत्परता दाखवत नाही. शाहरुख खानच्या मुलाला जामीन मिळत नाही, एक बर झालं हायकोर्टावर यांचा संशय नाही. अन्यथा ते म्हणाले असते हायकोर्ट देखील यांनी मॅनेज केलं. पाळंमुळं काढण्यासाठी हायकोर्ट जामीन देत नसेल, तर एवढं तडफडण्याचं काम नाही. हे सर्व बरोबर नाही, असंही चंंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लोकांना तुरूंगात ठेवून पब्लिसिटी करून घेणं हा वानखेडेचा उद्योग’- नवाब मलिक
- ‘…नंतर ‘तेच’ माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काम करत होते’, भुजबळांनी सांगितला जेलवारीचा अनुभव
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप करा – शंभूराज देसाई
- वळसे पाटील कोरोनावर मात करून लवकरच सेवेत रुजू व्हाल, याची खात्री- अजित पवार
- आर्यन खानच्या मदतीला जुही चावला आली धावून म्हणाली…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

