Share

शिवसेनासोबत असल्यानेच माझे केस उडाले, आता फडणवीस सांगतील तसं आपण धावायचं – चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईत भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी राज्यात ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे सरकारमधील दोन मंत्री लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केलाय.

दरम्यान, मागील सरकारच्या काळात शिवसेना सोबत असल्यानेच माझे केस उडाले, असं मिश्किल विधान करत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला देखील लक्ष्य केलं आहे. ‘पाच वर्षे सरकारमध्ये आपण होतो. माझ्याकडे आठ आठ खाती होती. माझे केस उडाले ते त्यांच्याबरोबर सरकार चालवण्यामुळे झाले आहे. रोज भांडणं… रोज भांडणं… सकाळी उठलं की राऊत जाकीट बिकीट घालून रोज शिव्याशाप… अरे सरकारमध्ये आहात ना बाबा तुम्ही… रोज राजीनाम्याची धमकी… रोज बाहेर पडण्याची भाषा… एवढंच कळतं की बाहेर पडायचं… खोडा घालायचा… त्यामुळे आपल्याला आपल्या ताकदीवर सरकार आणायचं आहे. देवेंद्र फडणवीस सांगतील तसं आपण धावायचं आहे,’ असं त्यांनी कार्यकर्त्यांना बजावून सांगितलं आहे.

चंद्रकांत पाटलांच भुजबळांना खुलं आव्हान –

‘छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे सरकारमधील दोन मंत्री लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत. ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपच्या मनात खोट नाही. छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर कोल्हापूरच्या बिंदू चौकात येऊन देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी. म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होईल,’ असं भाष्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!