Share

‘छगन भुजबळांनी बिंदू चौकात येऊन फडणवीसांशी चर्चा करावी म्हणजे…; चंद्रकांत पाटलांच खुलं आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईत भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी राज्यात ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करतानाच मंत्री छगन भुजबळ यांना खुलं आव्हान दिलं आहे. भुजबळांनी कोल्हापुरातल्या बिंदू चौकात फडणवीसांसोबत चर्चेसाठी यावं, म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होईल असं पाटील म्हणाले.

‘छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे सरकारमधील दोन मंत्री लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत. ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपच्या मनात खोट नाही. छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर कोल्हापूरच्या बिंदू चौकात येऊन देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी. म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होईल,’ असं भाष्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

तर, ‘राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. ओबीसी आरक्षण संपवण्याचे काम या सरकारने केले आहे. या मुद्द्यावर खोटे बोल पण रेटून बोल या पद्धतीने कारभार चालला आहे. आपली चूक झाली हे माहीत असल्याने सध्या महाविकास आघाडीचे नेते कमी बोलत आहेत आणि त्यांचे बोलके पोपट जास्त बोलत आहेत. मालक जसे सांगतात तसे हे पोपट बोलतात,’ अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!