मुंबई : आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली होती. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील ही युती होत असेल तर आनंदच असल्याची प्रतिक्रिया दिली.
त्यामुळे मनसे-भाजपच्या युतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली असून महाविकास आघाडीला पुढील निवडणुकांमध्ये शह देण्यासाठी मनसेची साथ आणि मनसेला सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपची साथ महत्वाची ठरेल. दरम्यान, या भेटीनंतर राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर तर चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते.
आता चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रात परतले असून त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी राज ठाकरेंच्या भेटीबाबत देखील त्यांनी वरिष्ठांना माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले पण यावेळी त्यांनी युतीचा प्रस्ताव दिला नसल्याचे देखील नमूद केलं आहे.
‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती आपण केंद्रीय नेतृत्वाला दिली. ठाकरे यांच्यासोबतची भेट भूमिका समजून घेण्यासाठी होती व त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या युतीचा प्रस्ताव नव्हता, असे आपण केंद्रीय नेतृत्वाला सांगितले,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं ठाकरे सरकारच झिंगलंय कारण कुटुंब वसुलीत रंगलय’
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
- ठरलं ! 17 ऑगस्टपासून राज्यातील ‘या’ इयत्तेचे वर्ग भरणार
- नांदेड विभागातून तीनशेवी किसान रेल्वे सुसाट; महसूलात कोटींनी वाढ!
- मंत्रिमंडळ “खो खो” आणि अनिल देशमुख सध्या लपाछपी खेळताय, भाजपचा टोला


