Share

“फिरसे उतरना पडेगा मैदान में…”; मुख्यमंत्र्यांच्या आजच्या सभेवर संजय राऊतांचं ट्विट

Published On: 

मुंबईः  आज मुंबईतील बेकेसीमध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी शिवसेनेला व ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यामुळं आजची सभा वादळी ठरणार असल्याचे अंदाज बांधले जात आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वीच संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे.

संजय राऊतांनी आज सकाळीच एक शायरी ट्वीट केली आहे. “लगता है फिरसे उतरना पडेगा मैदान में दुबारा, कुछ लोग भूल गये है अंदाज हमारा!”, अशी शायरी ट्विट करत अप्रत्यक्षरित्या विरोधकांवर राऊतांनी निशाणा साधला आहे. तसेच, शायरीच्या शेवटी जय महाराष्ट्र असेही ते म्हणाले.

सध्या राज्यात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा या मुद्द्यांवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. तर, भाजप ही हा मुद्दा उचलून धरत ठाकरे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं या जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना जशास तसे उत्तर देणार असल्याचे बोलले जात आहे. सभेआधीच संजय राऊत यांनी शायरीतून विरोधकांना इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!