Share

“तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा”; या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळेवर गुन्हा दाखल!

Published On: 

ठाणे : अभिनेत्री केतकी चितळे ही आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. याआधीही शरद पवारांचा अपमान करणारी पोस्ट केतकी चितळे हिने केली होती. फेसबुकवर हीनं शरद पवारांच्या आजाराचा संदर्भ घेऊन टीका केली होती. यावरून तिला भरपूर ट्रोलही केले जात होते. आता पुन्हा एकदा केतकी चितळे चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट केतकी चितळे हिने केली आहे. या पोस्टमुळे केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वकील नितीन भावे यांनी लिहिलेले कविता केतकी चितळे हिने फेसबुकवरुन शेअर केली आहे. यावर हजारो लोकांनी कमेंट केल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जवाहर राठोड यांची ‘डोंगराचे ढोल’ या संग्रहातील ‘पाथरवट’ ही कविता लोकांसमोर सादर केली होती. अभिनेत्री केतकी चितळे हिने देखील ‘तुका म्हणे पवारा..’ ही कविता फेसबुकला शेअर करत शरद पवारांवर निशाणा साधलाय.

केतकी चितळे हिने पोस्टमध्ये लिहिलंय की…

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

-Advocate Nitin Bhave

भाजपकडूनही पवारांवर टीका –

शरद पवारांनी परवा साताऱ्यामध्ये जवाहर राठोड यांची `डोंगराचे ढोल’ या संग्रहातील `पाथरवट’ ही कविता लोकांसमोर आणली होती. त्यानंतर त्यावर अनेक चर्चा केल्या गेल्या.  “शरद पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढालेत. पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवारसाहेब या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा!” असा गंभीर आरोप करत भाजपने ट्विटर हँडलवरून शरद पवार यांचा साताऱ्यातील भाषणाचा व्हिडिओ ट्विट केला होता.

महत्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!