Share

‘मला संभाजीराजेंबद्दल आदर त्यांच्या टीकेवर कोणतचं उत्तर देणार नाही’- अशोक चव्हाण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठा समाजाला अद्यापही आरक्षणाची प्रतीक्षा असून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाज हा आक्रमक झाला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता मराठा समाज हा पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महापूर आणि राज्यातील कोरोनाची स्थिती ओसरल्यानंतर आता मराठा समाजाने पुन्हा आंदोलन सुरु केलं आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात आज नांदेडमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे मूक आंदोलन सुरु आहे. यावेळी बोलताना संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला . तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं कौतुक केलं आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि नांदेडचे पालकमंत्रिपद असलेले अशोक चव्हाण यांनी मूक आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने मराठा समाजासह संभाजीराजे यांनी देखील त्यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच यावर बोलताना ते म्हणाले हिते कि, ‘राज्यात अनेक जिल्ह्यात आंदोलनं झाली, त्यावेळी त्या त्या पालकमंत्र्यांनी उपस्थिती लावून पाठिंबा दिला. नांदेडचे पालकमंत्री कुठे आहेत? अशोक चव्हाण दिल्लीत सगळ्यांना भेटले, पण संभाजीराजेंना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. अशोक चव्हाण यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ते इथे आले नसावेत. आमच्या आंदोलनात सगळे आले पण अशोक चव्हाण का आले नाही? आम्ही सुद्धा 96 टक्के वाले मराठे आहोत’, असं म्हणत संभाजीराजे यांनी अशोक चव्हाणांवर सडकून टीका केली आहे.

दरम्यान यावर अशोक चव्हाण यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते म्हणाले कि, ‘मला संभाजीराजेंबद्दल आदर आहे. आमचे आणि त्यांच्या घराण्याचे संबध हे पूर्वीपासूनचे आहेत. त्यामुळे मी त्यांच्या टीकेवर कोणतचं उत्तर देणार नाही.’ असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!