नागपूर : भारतीय जनता पक्षाने जनआशीर्वाद यात्रा काढली आहे. भाजपचे मंत्री राज्यभर फिरत आहेत. मात्र जनतेला महाविकास आघाडीचे काम आवडले आहे. त्यामुळे अशा यात्रांनी काहीच फरक पडणार नसून सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय होईल, असा दावा काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मुंबईत राज्यव्यापी बैठक घेतली. यावेळी मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर यावेळी जोरदार टीका करण्यात आली. अशोक चव्हाण यांना विश्वासघातकी पुरस्कार दिला जाणार असल्याचा खोचक टोला मेटे लगावला. चव्हाण यांनी मराठा समाजाच्या विरोधात निर्णय घेतले. उपसमितीवरून त्यांची तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणीचा पुनरुच्चार मेटे यांनी केला.
यावर थोरात म्हणाले की, मराठा आरक्षणात राज्य म्हणून भूमिका आणि अशोकराव चव्हाण यांनी चांगलं काम केले. न्यायालयात योग्य बाजू मांडली, मात्र भाजप राजकारण करत आहे, केंद्रानं निर्णय घ्यावा, ५० टक्क्यांवर आरक्षण वाढवावे. विनायक मेटे काय म्हणतात याला आम्ही महत्त्व देत नाही, असा चिमटाही त्यांनी घेतला.
तसेच बैलांच्या शर्यती व्हायला हव्या. बैलबंडी शर्यतीवरील बंदीचा निर्णयाचा केंद्राने फेरविचार करावा. या शर्यतीमुळे ग्रामीण भागात एक उत्साहाचे वातावरण असते. त्या काळातील परिस्थिती पाहून बंदीचा निर्णय झाला असेल, पण आता सरकार तर भाजपची आहे, त्यामुळे त्यांनी बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी थोरात यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू
- कोकण पुरामुळे बुडत असताना स्वतःला कोकणचा नेता म्हणवून घेणारे कुठे होते? – भाई जगताप
- ‘गोमूत्र शिंपडणारे समोर आले असते तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखं घशात घालून पुढे निघालो असतो’
- संभाजीराजेंनी केलं प्रकाश आंबेडकरांच कौतुक; तर अशोक चव्हाणांवर हल्लाबोल
- अशोक चव्हाणजी, आम्हीही ९६ टक्केवाले मराठे आहोत!’, संभाजीराजेंचा हल्लाबोल

