औरंगाबाद : गेल्या दोन वर्षांपासून आपण कोरोनाचा सामना करत आहोत. या काळात सर्वाधिक नुकसान झाले ते एसटी कर्मचारी वर्गाचे. कोरोना संसर्गाच्या काळात कधीही न थांबणारी एसटी बससेवा बंद पडली. परिवहन महामंडळाची कोटींची उलाढाल ठप्प झाली. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही मोठा परिणाम झाला. आधीच कमी वेतनात काम करणारे एसटी चालक वाहक पगाराच्या प्रतीक्षेत आता हवालदिल होत आहेत. औरंगाबाद विभागातील एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने आर्थिक विवंचनेतून काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न अधिकच बिकट होत चालला आहे.
कोरोनाच्या काळातही एसटी विभाग सक्रीय होता. स्थलांतरित मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी एसटी विभागाची मोलाची मदत झाली. या काळात एसटीचे उत्पन्न कमी झाले. कर्मचाऱ्यांचा पगार करण्याइतपतही पैसे एसटीकडे उरले नाही. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर हळूहळू एसटी बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. प्रवाशांचा प्रतिसादही वाढताना दिसत आहे. मात्र इंधनाचे वाढलेले भाव, बस मेंटेनन्सचा वेगळा खर्च, दुरुस्ती वर आलेल्या बसेस या पार्श्वभूमीवर अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याची परिस्थिती आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने वेतन वेळेवर होत नसल्याची प्रतिक्रिया विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर आत्महत्येची वेळ
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद मनपात असलेल्या कोविड हेल्पलाईन सेंटरवर मदतीसाठी एक फोन आला होता. पतीचा पगार वेळेवर न झाल्याने आलेल्या आर्थिक अडचणींमुळे एसटी चालकाच्या पत्नीने आत्महत्या केली. आणि पाठीमागे उरलेल्या दोन मुलांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली. आता नोकरी करावी की दोन मुलांना सांभाळावे. या विवंचनेत असलेल्या ३२ वर्षीय कर्मचाऱ्याने हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून आपली आपबिती कथन केली. २ महिने मनपाद्वारे त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘..यामुळेच शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली’, खा.भावना गवळींचा खुलासा
- नितीन लांडगे यांच्याविरुद्ध झालेल्या आरोपांची शहानिशा करण्याची जबाबदारी माधुरी मिसाळ यांच्यावर
- पारनेर तहसीलदारांच्या ऑडिओ क्लिपवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया
- शेतकऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष लक्ष, रावसाहेब दानवेंचे प्रतिपादन!
- शिवसेनेच्या हल्ल्यांना आणि धमक्यांना मी घाबरत नाही – किरीटी सोमय्या

