🕒 1 min read
औरंगाबाद : एसटी बस दिवसेंदिवस आधुनिक होत चालली आहे. आता सर्वसामान्य प्रवाशांना एसटी महामंडळाचे लोकेशन पाहता येणार आहे. आता यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे समजते. लोकेशन मिळण्यासाठी मदत करणाऱ्या एमएसआरटीसी कंप्यूटर या अॅपचे लाँचिंग स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी होणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हे लॉन्चिंग होऊ न शकल्याने बसचे लोकेशन पाहण्यासाठी आता आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
एसटी महामंडळ प्रवास हा जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असून त्यादिशेने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दिलेल्या वेळेत फ्लॅट फॉर्मवर बस दिसत नाही. अशावेळी बस कुठे असेल, याची माहिती नसते. अधिकाऱ्यांकडून तसेच संबंधित चालकाकडून हि माहिती घ्यावी लागते. आता व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीममुळे हे काम अधिक सोपे होणार आहे. बस कोठे आहे आणि ती किती वेळात प्रवाशांपर्यंत पोहोचू शकेल याची माहिती सर्वसामान्य प्रवाशांना मिळावी यासाठी एसटी महामंडळाने एमएसआरटीसी कम्प्युटर विकसित केले आहे.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उद्घाटन करण्यात येणार होते. त्यानंतर ते सर्वांसाठी खुली होणार होते. दरम्यान यातील काही तांत्रिक अडचणीमुळे याची लॉन्चिंग होऊ शकले नाही. त्यामुळे बस लोकेशन मिळण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. औरंगाबाद विभागातील ४५० बसेसना ही सिस्टीम बसविण्यात आली आहे. ही सिस्टीम कार्यान्वित देखील करण्यात आली आहे. लॉन्चिंगनंतर ते सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर बस किती वाजता येईल? हे विचारण्याची आवश्यकता राहणार नाही. घरबसल्या गाडी कुठपर्यंत पोहोचली आहे याची माहिती आपण मिळवू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्य सरकारच्या योजनांचा निधी चालतो मग केंद्रांचा का नाही? सत्तारांच्या सिल्लोडात भाजपचा सवाल!
- ‘मी प्रबोधनकार ठाकरेही वाचले आणि यशवंतरावही; राज ठाकरेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
- वेतनाच्या प्रतिक्षेत एसटी कर्मचारी हवालदिल, कुटुंबीयांवर आत्महत्येची वेळ!
- जनआशीर्वाद यात्रेने काहीही फरक पडणार नाही-बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
