पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. आज पुण्यात पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मी एका कार्यक्रमात तसं वक्तव्य केलं होतं. पण, माझ्या वक्तव्याचा आणि माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वक्तव्याचा काय संबंध होता. ‘मी प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकंही वाचली आहेत आणि यशवंतराव चव्हाण यांची पुस्तकं सुद्धा वाचली आहे. मी जे काही बोललो त्याचा आणि माझ्या आजोबांच्या पुस्तकांचा काय संबंध होता हे शरद पवार यांनी समजून सांगावे, अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मी सर्वांची पुस्तकं वाचलेत. प्रबोधनकरांचे संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं, असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही लिखाण वाचलं आहे, त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असा जोरदार टोला राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीवाद वाढला, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं लेखन वाचण्याचा सल्ला देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचं राजकारण वाढलं; राज ठाकरेंचा पुनरुच्चार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे ‘उन्नत भारत’ अभियान!
- ‘गोमूत्र शिंपडणारे समोर आले असते तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखं घशात घालून पुढे निघालो असतो’
- संभाजीराजेंनी केलं प्रकाश आंबेडकरांच कौतुक; तर अशोक चव्हाणांवर हल्लाबोल
- अशोक चव्हाणजी, आम्हीही ९६ टक्केवाले मराठे आहोत!’, संभाजीराजेंचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
