Share

‘गरीब मराठा’ हा शब्द मी आणलाय’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज (7 फेब्रुवारी) पुण्यात ‘गरीब मराठा समाज संवाद मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेल्या खटल्यावरुनही फटकेबाजी केली.

‘मला एका मराठा समाजाच्या व्यक्तीने सांगितलं, सत्तेत असलेला मराठा समाज गरीब मराठ्यांची पोरगी करत नाही. कॉलेजला असलेल्या मुला-मुलीचं जमतं. पण सत्तेत असलेला मराठा समाज गरीब मराठ्यांच्या मुलींशी लग्न करत नाही. सामाजिक बदल झाला पाहिजे, पण तो होत नाही. त्यामुळी मी गरीब मराठा मेळावा घेण्याचं ठरवलं. विशेष म्हणजे काही मराठा नेत्यांनी गरीब मराठा मेळावा घेण्याची हिंमत दाखवली त्याबाबत मी त्यांचं अभिनंदन करतो. गरीब मराठा सत्तेत येत नाही तोपर्यंत बदलाची अपेक्षा करू नये. असे म्हणताना ‘गरीब मराठा’ हा शब्द मी आणलाय’, असे म्हणायला प्रकाश आंबेडकर विसरले नाहीत.

‘मी कॉलेजला असतांना आरक्षणाचा मुद्दा कधीच चर्चिला गेला नाही. कोण कुठं शिक्षणाला जाणार याची त्यावेळी सोय केली होती. तेव्हा भांडणं कुठंच झाली नाहीत, आजच भांडणं का? लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढली, त्याप्रमाणे विद्यार्थी संख्या वाढत गेली. दुर्दैवाने त्यानुसार राज्य कर्त्यांनी नियोजन केले नाही’, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!