Share

‘उस्मानीचे भाषण ऐकले नाही, मुळात एल्गार परिषदेला महत्व देत नाही’

Published On: 

🕒 1 min read

पुणे: एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली.

शरजिल उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केली होती. यावरून आता भाजपने आक्रमक भूमिका घेत अजूनही राज्य सरकार व पोलीस कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, एल्गार परिषदेतील शरजील उस्मानी याच्या भाषणामुळे वाद पेटला आहे. भाजप पाठोपाठ वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही एल्गार परिषदेवर टीका केली. ‘आपण अद्याप शरजील उस्मानीचे भाषण ऐकले नाही. मुळात एल्गार परिषदेला मी महत्व देत नाही. अगोदरच्या एल्गार परिषदेच्या हेतू वेगळा होता’ अशी टीका आंबेडकर यांनी केली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी शेतकरी आंदोलनापासून ते राज्यातील राजकीय घडामोडींवर आपले रोखठोक मत व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!