🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूड मधील कॉमेडियन अभिनेता राजपाल यादव आपल्या कॉमेडी भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या भूमिकेतून राजपाल यादव प्रत्येकाला हसवतात. दरम्यान राजपाल यादव सध्या चित्रपटांपासून लांब दिसत आहे. अशातच ओटीटी प्लॅटफॉर्म दिसणार का असा प्रश्न देखील उपस्थित होत होता. याबाबत आता राजपाल यांनी उत्तर दिलं आहे.
नुकतंच एका मुलाखतीदरम्यान राजपाल यांनी सांगितलं, ‘ओटीटी खूप ट्रेंड करत आहे, पण मला वाटत नाही की मी त्यात बसू शकेन. ज्या प्रकारच्या वेब सिरीज काही वर्षांपासून येत आहेत, त्या मला फारश्या आवडल्या नाहीत. मला गैरवर्तन करायला आवडत नाही, आणि वेब सीरिजमध्ये आजकाल हेच चालू आहे. माझ्या कामासाठी शिव्या न देता मला टाळ्या मिळाल्या आहेत. असं यावेळी अभिनेत्याने सांगितलं आहे.
राजपाल पुढे म्हणाले, ‘ज्या गोष्टी मला आवडत नाहीत मी त्या गोष्टी कधीच करत नाही. मला चुकीच्या गोष्टी सांगून पैसे कमवायला नाही आणि कृतज्ञतेनं मी तसं करत नाही. मी खूप भाग्यवान आहे की 2 दशकांनंतरही लोक मला पाहून कंटाळले नाहीत. मला माझ्या चाहत्यांना पूर्ण श्रेय द्यायचं आहे ज्यांनी माझ्यातील अभिनेत्याला जिवंत ठेवलं आहे. असं देखील राजपाल यादव म्हणले.
महत्त्वाच्या बातम्या
- श्रेयस अय्यर पुनरागमनासाठी सज्ज, टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य
- ओव्हल कसोटीतुन ‘हा’ भारतीय दिग्गज खेळाडू होणार संघाबाहेर
- ओव्हल कसोटीसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, ‘या’ दिग्गजाचे झाले पुनरागमन
- ‘ऐसा कैसा चलेगा अनिल?’ ; भाजपच्या नेत्याने परबांवर डागले टीकास्त्र
- पुणे शहरात कोरोनाचे २०७ रुग्ण गंभीर तर २९८ रुग्ण ऑक्सिजनवर

