नवी दिल्ली : यंदा केंद्राचे पावसाळी अधिवेशन हे वादळी ठरलं आहे. पेगासस प्रकरण, शेतकरी आंदोलन, आदी मुद्द्यांवरून विरोधकांनी केंद्र सरकारची कोंडी केली होती. विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाजाचे बहुतांश दिवस हे वाया गेल्यानंतर १०२ व्या घटना दुरुस्तीनिमित्त विरोधकांनी एक पाऊल मागे घेत संसदेत उपस्थिती लावली. काल लोकसभेत १०२ व्या घटना दुरुस्तीचे विधेयक मांडण्यात आले. दोनतृतीयांश मतांनी घटना दुरुस्ती मान्य झाल्यानंतर आज राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात आले आहे.
यावर चर्चा करताना शिवसेना खासदार संजय राऊत हे चांगलेच कडाडल्याचे पाहायला मिळालं. ‘आता ५० टक्क्यांची अट शिथिल करून आरक्षण देण्याची वेळ आली आहे. मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात आंदोलने केली, मोर्चे काढले. हे सर्व मोर्चे शांततेत झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे स्वतः ५० टक्क्यांची अट काढून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आंदोलनात उतरले. आजही ते मराठा समाजासाठी आंदोलन, मोर्चे करत आहेत. छत्रपती आरक्षणासाठी आंदोलनात उतरले, हे या आधी कधी बघितलंय का ?’ असा सवाल करत संजय राऊत यांनी संभाजीराजे यांची पाठ थोपटली.
पुढे त्यांनी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचा उल्लेख करत वंचित घटकांना त्यांनी स्वातंत्र्याआधी पहिलं आरक्षण देऊन त्यांना पुढे आणले असल्याचे देखील राज्यसभेत सांगितले. तसेच, फक्त घटना दुरुस्तीने मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसून आता ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवून टाकावी अशी मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोलापूर जिल्ह्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांना व्यापारी महासंघाने केला तीव्र विरोध
- पुराशी सामना केल्यानंतर आता डेल्टा प्लसने कोल्हापूरकरांची चिंता वाढवली
- निर्बंध शिथिल करण्याबाबत पुण्याला वेगळा आणि सोलापूरला वेगळा न्याय का ?
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- ‘चूकीचा उत्सव आणि चूक सुधारण्याचा इव्हेंट, एवढा कॉन्फिडन्स सरकारकडे येतो कुठून’, संजय राऊतांचा केंद्राला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

