मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकवरून राज्यातील जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधला. यावेळी त्यांनी सीएसआर फंडावर अधिक भाष्य न करता केंद्र सरकारला चिमटे काढले. मला सीएसआर फंडाच्या राजकारणात जायचं नाही. ज्यांना मुख्यमंत्री निधीला सीएसआर फंड द्यायचा आहे. त्यांच्यासाठी वेगळं अकाऊंट उघडण्यात आलं आहे. ते तिकडे रक्कम जमा करू शकतात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
किटसह सर्व सुविधा डॉक्टरांना पुरवल्या जातील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. पीपीई किट किंवा उपकरणांचा तुटवडा असल्याची सत्यता त्यांनी यावेळी मान्य केली. पण मुंबईसह राज्यभरातील डॉक्टरांनी कोविड व्यतिरिक्त तपासणी करण्यासाठी क्लिनिक सुरु ठेवण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातील इतर डॉक्टरांनाही त्यांनी असे करण्याचे आवाहन केले.
यावेळी राज्यातील सर्व डॉक्टरांचेही उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. नागरिकांना या काळात ताप-सर्दी-खोकला असा कोणताही आजार असेल तर लगेच तपासणी करुन घ्यावी असं आवाहन सरकारने केलं आहे. या काळात खासगी डॉक्टरांचे दवाखानेही सुरुच असतील. याचसोबत केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या तांदळाव्यतिरीक्त राज्याने गहू आणि डाळीचीही मागणी केल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

