Share

पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही – राम शिंदे

Published On: 

मुंबई – भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे. प्रीतम मुंडे यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा होती मात्र त्यांच्या जागी डॉ भागवत कराड यांना स्थान मिळालं. यानंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली. यानंतर बीड, नगरमध्ये पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आज (१३ जुलै) मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली आहे. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं समर्थक आक्रमक झालेत मुंडे भगिनींना भेटण्यासाठी ते परळीहून मुंबईत दाखल झालेत.आज या बैठकीत काय होणार? पंकजा मुंडे समर्थकांना काय सांगणार? त्यानंतर राजीनामा सत्र बंद होणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

एका बाजूला या घडामोडी सुरु असताना दुसऱ्या बाजूला भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळे मुंडे समर्थक नाराज होणं स्वाभाविक आहे. पण पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

आपल्या मनासारखा निर्णय झाला नाही तर आपण घरात देखील नाराजी व्यक्त करतो. सध्या देवेंद्र फडणवीस राज्यातील पक्षाचे प्रमुख नेते आहेत. ते माजी मुख्यमंत्री आहेत आणि विरोधी पक्षनेतेही आहेत. त्यामुळे घरच्या कारभाऱ्याकडे नाराजी व्यक्त होणं स्वाभाविक आहे. पण त्यातून मार्ग निघेल, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!