🕒 1 min read
कोलकाता – भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत. कॉंग्रेसची या निवडणुकीत डाव्यांच्या सोबत आघाडी आहे तर एमआयएम देखील या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहे.यामुळे ममता बॅनर्जी यांना भाजपाबरोबरच एमआयएम ,काँग्रेस आणि डाव्यांच्या आघाडीविरोधात लढावे लागणार आहे.
एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला सध्या सोशल मीडियावर तृणमुलच्या खासदार नुसरत जहाँ यांचा एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे या व्हीडिओत नुसरत जहाँ काहीश्या चिडलेल्या दिसत आहे.
नुसरत जहाँ पश्चिम बंगालमध्ये रोड शो करतानाचा हा व्हीडिओ आहे. यावेळी तृणमुलचे काही नेते त्यांना आणखी काही काळ प्रचार करण्यासाठी गळ घालताना दिसत आहेत. मात्र, नुसरत जहाँ यांनी त्यांची मागणी सरळ धुडकावून लावली.
भाजप बंगालनं त्यांचा हा व्हिडीओ शेअर करत फिरकी घेतली आहे. ‘नुसरत जहाँ टीएमसी खासदार, मी एका तासापेक्षा जास्त प्रचार करू शकत नाही, इतकं तर मी ममता बॅनर्जींसाठीही करणार नाही,’असं त्यांनी या व्हिडीओसह लिहिलं आहे.
TMC MP Nusrat Jahan " I can't do rally for more than 1 hour, I don't even do it for CM"???? #MamataLosingNandigram pic.twitter.com/p0jOm4iy03
— BJP West Bengal (@BJP4Bengal) March 28, 2021
महत्वाच्या बातम्या
- ये बॅट हमको दे, दे ठाकूर ; शार्दुलच्या शानदार षटकारावर स्टोक्स फिदा
- ‘रिषभ जर असाच खेळत राहिला तर तो ‘या’ दोघांनाही मागे टाकेल’
- शार्दुल-भुवनेश्वरला पुरस्कार न मिळाल्याने विराट भडकला, म्हणाला…
- ‘नाईट कर्फ्यू’चा सायना चित्रपटाच्या कमाईवर परिणाम! बिग बींचा ‘चेहरे’ लांबणीवर पडणार?
- मराठी कलाकार झाले रंगात बेधुंद ; जोडीदारासोबत पहिलीच होळी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
