Share

मोहटादेवीच्या आशीर्वादानेच मी आमदार झालो- आ.निलेश लंके

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:– माझ्या आमदारकीच्या काळात मोहटादेवी गड परिसरात राज्य शासनाच्या विविध योजना राबवून या परिसराचे नंदनवन करू, तसेच महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या माता मोहटादेवीचा मी निस्सीम भक्त असुन माता मोहटादेवीच्या आशीर्वादाने माझ्या जीवनास कलाटणी मिळाली आहे. मी मोहटादेवीच्या आशीर्वादानेच आमदार झालो आहे, असे प्रतिपादन पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार निलेश लंके यांनी केले आहे.

पुढे बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले, माझ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मी मोहटादेवीच्या परिसराचा जास्तीत जास्त विकास करणार असून, तुम्ही फक्त विकास आराखडा राज्य शासनाकडे पाठवा. पर्यटन विकास असो किंवा तीर्थक्षेत्र विकास असो पाठपुरावा करण्याचे काम मी करतो.

पालघर जिल्ह्यात पुन्हा जाणवले तीन भूकंपाचे धक्के; दोन वर्षात ५४ धक्के, भूकंपाचं सत्र सुरू…

राज्याला अजितदादा पवार हे कार्यक्षम उपमुख्यमंत्री लाभल्यामुळे भक्तनिवास, घाटरस्ता, घनकचरा व्यवस्थापन या विकास कामांसाठी आपल्याला जेवढ्या योजनेमधून निधी मिळवता येईल तो मिळवण्याचा माझा प्रयत्न असेल, असे आ.लंके म्हणाले.

‘हे’ आहेत पुण्यातील ५ सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळलेले क्षेत्रीय कार्यालये

मोहटादेवी गडावर आमदार निलेश लंके यांनी गडाच्या विकास कामाच्या संदर्भात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार लंके यांच्या समवेत गोकुळ दौंड, संस्थेचे विश्वस्त भीमराव पालवे, विक्रम दहिफळे, अशोक दहिफळे, आदिनाथ आव्हाड, महादेव दहिफळे, पंचायत समितीचे उपअभियंता रामकृष्ण सरोदे, सुभाष केदार यांच्यासह मोहटादेवी मंदिर ट्रस्टचे अनेक सदस्य, पाथर्डी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

अनिल देशमुखांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार आहे का ?

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!