Share

पालघर जिल्ह्यात पुन्हा जाणवले तीन भूकंपाचे धक्के; दोन वर्षात ५४ धक्के, भूकंपाचं सत्र सुरू…

Published On: 

पालघर : देशासह राज्यात करूनच संकट थैमान घालत असतानाच इतर संकटाची मालिकादेखील सुरूच आहे. पूर्व विदर्भात आलेला पूर असो वा अनेक ठिकाणी झालेली अतिवृष्टी आणि शेतमालाचे नुकसान. यामध्ये आता पालघर येथे भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी तालुक्यात शुक्रवारी रात्री ११:४५ आणि १२: ५ वाजेच्या दरम्यान लागोपाठ 3.6, 2.8, 4.0 रिस्टर स्केलचे तीन धक्के जाणवले. या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल होत. यावेळी घरातून सर्व गावकऱ्यांना बाहेर काढण्यात आल. यामध्ये सुदैवाने जीवित जीवित हानी झाली नसल्याचा तहसीलदारांनी सांगितले.

डहाणू तलासरी तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी, अंबोली, आशागड, कासा बोर्डी बोईसर या भागात हे धक्के जाणवले. तर राज्यात अगोदरच कोरोनाच मोठे संकट असताना या आणखी एका संकटाने डोके वर काढले नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. तर कोरणा संकटाचा सामना करण्यात गुंतलेले पालघर प्रशासन आता या भूकंप सत्राचा सामना करावा लागत आहे.

अनिल देशमुखांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार आहे का ?

2018 पासून पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सातत्याने सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात 54 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे सातत्याने होणार्‍या भूकंप आणि नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत तर काही ठिकाणी भिंती दुभंगण्या च्या स्थितीत आहेत. जमिनी हादरून सोडणारी भूकंपाने घरावरील छत आणि घर कोसळले तर आम्ही जायचे कुठे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

‘या’ राज्यात पूर्व विद्यापीठ प्रमाणपत्र परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!