Share

अनिल देशमुखांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार आहे का ?

Published On: 

मुंबई : अलीकडेच कंगना राणावतने मुंबईत सुरक्षित वाटत नाही अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्यावर सध्या राज्यात चर्चा असून, कंगना राणावतनेही आपण मुंबईत येत असून, कोण आपल्याला रोखतो तेच पाहते, असे एक विधान केले आहे.

मुंबई पोलिस स्कॉटलँड पोलिसांच्या दर्जाची समजली जाते, ज्यांना मुंबईत राहणे सुरक्षित नाही असे वाटते त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, ज्या कुणी कलाकाराने हे वक्तव्य केले, त्याचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगना राणावतच्या वक्तव्यावर केली आहे.

‘या’ राज्यात पूर्व विद्यापीठ प्रमाणपत्र परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास

महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणारे सध्याचे गृहमंत्री देशमुख यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार तरी कसा ?असा या सगळ्याच्या निमित्ताने प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. यापूर्वी 2014 साली विदर्भातील जनतेने बहुमताने वेगळा विदर्भ झाला पाहिजे, अशी मागणी केली होती. स्वतंत्र विदर्भ राज्य होणे आवश्यक आहे,अशी प्रतिक्रिया त्यावेळचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.

अखेर पत्रकाराच्या मृत्यूनंतर राजकीय नेत्यांना जाग; “या” नेत्यांची पुण्यात महत्वाची बैठक

विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भाला विरोध केला. मात्र त्यावेळी देशमुख यांनी ‘वेगळ्या विदर्भाची मागणी ही बरीच जुनी आहे. परंतु, याआधी या मागणीला जनतेचा पाठिंबा नव्हता. ही मागणी लोकांनी केलेली नव्हती. मात्र स्वतंत्र विदर्भ या मागणीसाठी विदर्भाची जनता एकजुटीने उभी राहिल्यास जनतेच्या मागणीचा मान ठेवून वेगळा विदर्भ देणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया ना. देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली होती. त्यामुळे आता कंगना राणावतच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात कोणी राहावे? कोणी राहू नये? या बद्दल सध्याचे सल्ले देणे देशमुखांना तरी शोभत नाही.

भाजपने मला अटक करायचा खेळ रचला असला तरी मी माझ्या वक्तव्यावर ठामच : प्रताप सरनाईक

राज्यातील सत्तापक्ष हा बदलंतच असतो त्यामुळे देशमुख सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांनी सत्ता गेल्यावर परत वेगळ्या विदर्भाची मागणी नाही केली म्हणजे मिळवले. कंगनाच्या मुद्द्यावरून सध्या मराठी अस्मितेचा मुद्दा करून शिवसेना नेहमीप्रमाणे राजकारण करताना दिसत आहे. कोरोनाच्या या महासंकटात ठाकरे सरकार राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात अपयशी झाल्याचे चित्र दिसतय. यामूळे आता या मुद्द्यावरून विरोधकांचे,माध्यमांचे लक्ष हटवण्यासाठी हा हट्टहास सुरू आहे का असा सवाल समोर येतो.

११ ऑगस्ट २०१२ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर दंगल उसळली होती. म्यानमारमधील मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी भेंडी बाजार ते आझाद मैदान असा ‘रझा अकादमी’ मार्फत मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाला येणाऱयांची संख्या कमी सांगितली गेल्याने पोलिसांनीही त्यानुसार बंदोबस्त लावला होता. परंतु, मोर्चा आझाद मैदानात पोहोचला तेव्हा हजारोंच्या संख्येने जमाव मोर्चात सामिल झाला. मोर्चाला रौद्र रूप मिळाले होते. त्यावेळी शिवसेना, भाजप, मनसे, आरपीआय या राजकीय पक्षांसह इतर सामाजिक संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला होता. मात्र 2012 साली रझा अकादमीला तीव्र विरोध करणारे शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यावर दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीसोबतच कार्यक्रमात पाहुणे म्हणून उपस्थित होते. म्हणजे याआधी केलेला निषेध आणि विरोध हा कितीपत खरा होता हे तेच जाणे!

सध्या कंगना आणि मुंबई हा वाद चांगलाच चिघळला आहे. या मुद्द्यावरून आपल्याला खूप मोठ्या राजकीय प्रतिक्रिया,वक्तव्ये ऐकायला मिळत आहेत. कंगनाच्या वक्तव्याला विरोध करताना विरोधी पक्ष भाजप महिला आयोगाला सोबत घेत असेल तर सत्ता पक्ष शिवसेना महिला विंगला सोबत घेऊन आंदोलने करत आहेत. कंगनाला मुंबईत , महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असा इशारा देत आहे.

कंगना राणावतने सुशांत सिंगच्या प्रकरणावरून म्हणाली होती की बॉलीवूडमधली सुमारे 99% लोक ड्रग्ज घेतात. रवीना टंडन यांनी कंगनाच्या या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे. ती ट्विटमध्ये म्हणते ‘99% न्यायाधीश, राजकारणी, बाबू, अधिकारी आणि पोलिस भ्रष्ट आहेत. ही विधाने प्रत्येकासाठी सामान्य वर्णन असू शकत नाहीत लोक समजूतदार आहेत ते चांगले आणि वाईट यात फरक करू शकतात. काही वाईट सफरचंद संपूर्ण बास्केट खराब करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या इंडस्ट्रीमध्येही चांगले आणि वाईट लोक आहेत.’

आता राजकीय पक्षामध्ये मराठी, हिंदुत्व, अशा मुद्द्यावरून जोरदार राजकारण बघायला मिळत आहे. मात्र सध्या या राज्यातील जनतेसमोर मराठी,हिंदुत्व हे मुद्दे सोडून देखील उपासमारी, कोरोना,लॉककडाऊनमुळे मंदावलेली अर्थव्यवस्था असे एक ना अनेक पन्नास प्रश्न आय वासून उभे आहेत राज्यातील या जनतेचे हे प्रश्न सोडवण्यातच सध्या या राजकारण्यांची अस्मिता टिकेल असेच म्हणावे लागते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!