🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यापासून देशात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काहीच दिवसांपूर्वी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत त्यांना खलिस्थान दहशतवादाचे समर्थक म्हणून संबोधले होते.
तर इतक्यातच आम आदमी पक्षाचे माजी सदस्य आणि कवी कुमार विश्वास यांनी पण अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. अरविंद केजरीवाल हे खलिस्थान फुटीरतावाद्यांचे समर्थक असल्याचा आरोप कुमार विश्वास यांनी केला होता, या नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि कुमार विश्वास यांच्या आरोपामुळे मोठा वाद उफाळला आहे.
या तिघांच्या आरोपाला प्रतिक्रिया देताना आज अरविंद केजरीवाल म्हणाले कि, ” मी आज पर्यंत दिल्लीमध्ये अनेक सरकारी शाळा आणि रुग्णालय उभे केल्या आहेत. शाळा-रुग्णालय उभारणारा इतका स्वीट दहशतवादी जगात नसेल अशी अरविंद केजरीवाल यांनी आज प्रतिक्रिया दिली. अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेल्या आरोपामुळे पंजाब राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘चंद्रकांत पाटील सारखा मी भविष्यकार नसून भाजीवाला आहे’ – छगन भुजबळ
- पिंपरी- चिंचवड महापालिका भवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा ; सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी
- …जेव्हा रेल्वेमंत्र्यांनी केला लोकलने प्रवास
- “मुख्यमंत्री ठाकरेंनी खुर्ची वाचवण्यासाठी पत्नीशी गद्दारी केली?”, सोमय्यांचा सवाल
- “….पुरावे असतात तेव्हा वाझे आणि अनिल देशमुख होतो”, भातखळकरांचा संजय राऊतांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
