🕒 1 min read
पुणे: करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत स्वतः चा नवीन पक्ष ‘शिवशक्ती सेना’ स्थापन केला असल्याचे म्हटले आहे. तसेच महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराबाबत मुख्यमंत्री ठाकरे(Uddhav Thackeray), महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. आज राज्यात कोणतीही महिला सुरक्षित आहे. दिशा सालीयन, पूजा चव्हाण, करुणा मुंडे या महिलांसोबत राज्यात काय झालं हे सर्वांनीच पाहिले. त्यामुळे मी महाराष्ट्रातील पहिला महिला आहे, स्वतःचा वेगळा राजकीय पक्ष स्थापन केला. तसेच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधत टीका केली आहे.
आज महिलांसाठी कुणीही उभे राहत नाही, त्यामुळेच आज मी एक वेगळा पक्ष निर्माण करत आहे. एक वेगळे राजकारण करत आहे. जसे शिवाजी महाराज यांनी सेनापतीचे पुत्र होऊन निजामविरोधात एक वेगळी मोहीम चालवली होती, आणि घराणेशाहीचे राजकारण बंद केले तसेच आज माझ्याही जीवाला धोका आहे. एक एकटी महिला असल्याने मी लढा देत आहे. पण मी हे मानते की, हार्ट अटॅक ने पण मी मरणार आणि कुणाची गोळी खाऊनही मी मारणार आहे. पण मी इतिहासाचा एक हिस्सा बनेल. जसे मी महाराष्ट्रातील पहिली महिला आहे, जिने मंत्र्याविरोधात आवाज उठविला. पहिला महिला जिच्या मंत्रीपतीने दोन मुलांची आई असणाऱ्या पत्नीला जेल मध्ये टाकले. पहिला महिला जिने स्वतःचा वेगळा राजकीय पक्ष स्थापन केला. त्यामुळे माझ्या मृत्यूने जर इतिहास बनत असेल तर मी ख़ुशी ख़ुशी मरायला तयार आहे. आणि क्रांतिकारी अमर असतात. आणि मी क्रांतिकारी आहे. असे म्हणत त्यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना चांगलाच टोला लगावला आहे.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा केला. मात्र जेव्हा उद्धव ठाकरे संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याविरोधात निदान एफआयआर दाखल करतील तेव्हा मी राज्यात शक्ती कायदा आहे, असे मानेल. सर्वांनाच माहिती आहे संजय राठोड यांच्याविरोधातील पुरावा काय आहे. त्यामुळे राज्याचे प्रधान या नात्याने त्यांनी निदान संजय राठोड यांच्याविरोधात एफआयआर तरी दाखल करावा. अशी मागणीही करुणा शर्मा मुंडे (Karuna Munde) यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांविरोधात एफआयआर दाखल करावा, तेव्हा मी…”; करुणा मुंडेंचे आव्हान
- “चंद्रकांत पाटलांनी उगाच इकडे तिकडे न तडमडता प्रतिमेला जपावं”, राऊतांचा हल्लाबोल
- नेत्याचा मुलगा म्हणून तिकीट मिळत नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना उत्पल पर्रीकरांचा सवाल; म्हणाले, ‘गुन्हेगारांना तिकीट देता मग..’
- पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीतील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर राऊतांचे भाष्य; म्हणाले,‘कधी काळी पंतप्रधानही…’
- “…औकात असेल तर करून दाखवा”, भातखळकरांचे संजय राऊतांना आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
