मुंबई: सध्या गोवा विधानसभेची निवडणूक वेगळ्याच कारणाने चर्चेत येत आहे. अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने भाजपासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत.त्यातच माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांना तिकीट मिळणार का? याबाबत अनेक प्रश्न निर्माण केले जात होते. त्यावरच केवळ नेत्याचा मुलगा म्हणून भाजपमध्ये तिकीट मिळत नाही. असे देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी म्हटले होते. यावरच आता उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पणजीतून तिकीट देऊ शकतात तर माझ्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला तिकीट का नाही देऊ शकत? असा सवाल उत्पल पर्रीकर यांनी केला आहे. असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच मला देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर बोलायचं नाही. मात्र केवळ पर्रिकरांचा मुलगा म्हणून मला तिकीट हवं असतं तर ते मी २०१९ मध्येच मागितलं असतं. भाजपचे अनेक कार्यकर्ते १९९४ पासून माझ्या वडिलांसोबत काम करत होते, ते आता माझ्यासोबत काम करत आहेत, असं उत्पल पर्रिकर यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी केवळ मनोहर पर्रिकर यांचा किंवा अन्य कुणाचा मुलगा म्हणून भाजपात तिकीट मिळू शकत नाही. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो. मनोहर पर्रिकर यांनी गोव्यामध्ये भाजपला स्थापित करण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे. मात्र केवळ मनोहर पर्रिकर यांचा किंवा अन्य कुणाचा मुलगा म्हणून भाजपात तिकीट मिळू शकत नाही. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो. त्यामुळे यासंदर्भात जो काही निर्णय घ्यायचा तो मी घेऊ शकत नाही. तो निर्णय आमचं पार्लामेंट्री बोर्ड आहे, ते त्यासंदर्भातील निर्णय घेईल. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
- कोणतीही कारवाई करण्यापूर्वी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न लक्षात घ्यायला हवा- पंतप्रधान मोदी
- “…औकात असेल तर करून दाखवा”, भातखळकरांचे संजय राऊतांना आव्हान
- राज ठाकरेंच्या सल्ल्यावर संजय राऊतांचे उत्तर; म्हणाले,‘कोणी काय सल्ला दिला यावर शिवसेना…’
- “तेरे वार पर पलटवार हु मै”, मुंबै बँकच्या अध्यक्षपदावरून रुपाली पाटील यांचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा
- “पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा?”, मनसेचा इशारा

