🕒 1 min read
मुंबई: सध्या राज्यात मराठी पाट्यांवरून चांगलेच राजकारण रंगताना दिसून येत आहे. त्यातच काल (१३ जानेवारी )संजय राऊत यांनी मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना दिलेल्या इशाऱ्यावरूनही बरीच टीका केली जात आहे. त्यावरच आता भाजप नेते अतुल भातखळकर ( BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे.
“मुंबईत, महाराष्ट्रात राहायचं आहे विसरु नका” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावरच ‘हीच भाषा, हीच मग्रुरी, हाच रुबाब मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार, भायखळा इथल्याही अमराठी पाट्यांना दाखवा. पाहूया तुमची हिम्मत.औकात असेल तर करून दाखवा.’ असे ट्वीट करत राऊत यांना खुले आव्हान दिले आहे.
हीच भाषा, हीच मग्रुरी, हाच रुबाब मोहम्मद अली मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार, भायखळा इथल्याही अमराठी पाट्यांना दाखवा… पाहूया तुमची हिम्मत… औकात असेल तर करून दाखवा. pic.twitter.com/RBfqCgSrW1
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 14, 2022
काय म्हणाले होते संजय राऊत?
राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र व्यापार संघटनांनी निर्णयाला विरोध केला असून हा निर्णय दुकान मालकांच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. यावरच संजय राऊत यांनी ‘विरोध करतो म्हणजे काय… तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र किंवा मग कर्नाटक प्रत्येक राज्याला अधिकार आहे, त्या भाषेचा अधिकार आहे. विरोध कसला करत आहात…तुम्हाला मुंबईत राहायचं आहे, महाराष्ट्रात राहायचं आहे हे विसरु नका. तुम्हाला येथे राहायचं आहे, व्यापार करायचा आहे. हे काही व्यक्तिगत किंवा राजकीय भांडण नाही कोणाचं. करणार नाही म्हणजे काय?’ अशा शब्दांत सुनावले होते.
महत्वाच्या बातम्या:
- नोटीस देणे, ट्विट करणे, मिडियाबाजी ही निव्वळ स्टंटबाजी; करुणा मुंडेंचा रुपाली चाकणकरांना टोला
- “गिरे तो भी टांग उपर”, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल ‘
- “पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा?”, मनसेचा इशारा
- “तेरे वार पर पलटवार हु मै”, मुंबैबँकच्या अध्यक्षपदावरून रुपाली पाटील यांचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा
- कोणतीही कारवाई करण्यापूर्वी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न लक्षात घ्यायला हवा- पंतप्रधान मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
