🕒 1 min read
मुंबई : काल(१३ जाने.)प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. यावेळी बोलत असतांना कोविडच्या नियमांबाबत सरकारमधील मंत्रीच एकमेकांना सहकार्य करत नाहीत. तुमच्या सततच्या निर्बंधांमुळे आत्महत्येचे सत्र आणखी वाढेल. नागरिक अक्षरशः कंटाळले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार नियमित सुरु आहेत, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, असे पाटील म्हणाले. दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या या टीकेवर आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राऊत म्हणाले की,’या संपूर्ण देशात कोणतं राज्य नीट असेल तर ते महाराष्ट्र आहे. चंद्रकांत पाटील किंवा भाजपाच्या अनेक नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल. नेत्रतज्ञ डॉक्टर लहानेंचं एखादं पथक भाजपाच्या कार्यालयात पाठवता येईल का हे पाहतो. त्यांना श्रवणयंत्रपण देणार आहे. शिवसेना असे मेडिकल कॅम्प घेत असतं. जर कोणाला गरज असेल तर त्यांच्यावर उपचार करु. महाराष्ट्रातील राज्य उत्तम प्रकारे सुरु आहे.’
दरम्यान, पुढे मुंबै बँकेच्या निकालावरून टीका करत राऊत म्हणाले की,’मुंबै बँकेच्या अध्यक्षपदीही महाविकास आघाडीचं नेतृत्व आलं आहे. हळूहळू या सगळ्या संस्था, संघटना यावर महाविकास आघाडीचा कब्जा असेल. चंद्रकांत पाटील हे फार सज्जन, निरागस, निष्पाप, निष्कपट आहेत. त्यांनी पुढील निवडणुकीची तयारी करावी. उगाच इकडे तिकडे न तडमडता प्रतिमेला जपावं,’असा सल्लाही यावेळी राऊतांनी दिला.
महत्वाच्या बातम्या:
- “पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा?”, मनसेचा इशारा
- राज ठाकरेंच्या सल्ल्यावर संजय राऊतांचे उत्तर; म्हणाले,‘कोणी काय सल्ला दिला यावर शिवसेना…’
- पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीतील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर राऊतांचे भाष्य; म्हणाले,‘कधी काळी पंतप्रधानही…’
- “ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा”, पंतप्रधान मोदींचा इशारा
- कोणतीही कारवाई करण्यापूर्वी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न लक्षात घ्यायला हवा- पंतप्रधान मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
