Share

“उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांविरोधात एफआयआर दाखल करावा, तेव्हा मी…”; करुणा मुंडेंचे आव्हान

Published On: 

पुणे: करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत स्वतः चा नवीन पक्ष ‘शिवशक्ती सेना’ स्थापन केला असल्याचे म्हटले आहे. तसेच महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराबाबत मुख्यमंत्री ठाकरे(Uddhav Thackeray), महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. आज राज्यात कोणतीही महिला सुरक्षित आहे. दिशा सालीयन, पूजा चव्हाण, करुणा मुंडे या महिलांसोबत राज्यात काय झालं हे सर्वांनीच पाहिले. पण आज प्रश्न फक्त या तिघींचा नाही. आज प्रश्न अनेक महिलांचा आहे. मात्र याविरोधात अनेक महिला मंत्रीमंडळात असूनही यासाठी आवाज उठवीत नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा केला. मात्र जेव्हा उद्धव ठाकरे संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याविरोधात निदान एफआयआर दाखल करतील तेव्हा मी राज्यात शक्ती कायदा आहे, असे मानेल. सर्वांनाच माहिती आहे संजय राठोड यांच्याविरोधातील पुरावा काय आहे. त्यामुळे राज्याचे प्रधान या नात्याने त्यांनी निदान संजय राठोड यांच्याविरोधात एफआयआर तरी दाखल करावा. अशी मागणी करुणा शर्मा मुंडे (Karuna Munde) यांनी केली आहे.

आज संपूर्ण महाराष्ट्रात २४ तासांत किती बलात्कार होतात, याची आकडेवारी किती आहे. याबाबत एकदा बघावे. मात्र संसदेत, मंत्रीमंडळात अनेक महिला असून कुणीही यासाठी पुढे धडजावत नाही. जेव्हा मी जेलमध्ये होती तेव्हाही माझ्यासाठी कुणीही उभे राहिले नाही. एकमेव चित्रा ताई होत्या. मात्र त्यांनीही फक्त मिडियासमोर पाठींबा दिला. मात्र मी त्याला पब्लिसिटी स्टंट समजते. जेव्हा प्रत्यक्षात त्या मंत्र्याविरोधात कारवाई केली जाईल, त्याला मी आवाज उठवणे समजते. असेही करुणा शर्मा म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!