🕒 1 min read
इस्लामाबाद : क्रिकेट म्हणजे भागीदारीचा खेळ असतो. या भागिदारीच्या खेळात अनेकदा क्रिकेटच्या मैदानावर सख्या भावांच्या अनेक जोड्या खेळल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेटमध्येही कामरान अकमल आणि उमर अकमल ही भावांची जोडी आहे.
या जोडीतील उमर अकमल हा २० फेब्रुवारी २०२० पासुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निलंबीत केले आहे. त्याच्यावर नियमांचे उल्लघंन करण्याचा आरोप आहे. या कारवाईत उमर अकमलला ४२,५०,००० पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड भरल्यानंतर त्याला पाकिस्तानच्या रिहॅबिलिटेशन पुर्ण केल्यानंतर क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली जाईल. या प्रकरणात उमरचा भाऊ कामरान पुढे सरसावला आहे. तो म्हणाला ,’माझ्या भावांचा दंड मी भरायला तयार आहे. पाकिस्तान प्रिमीयर लीगमध्ये मला मिळणाऱ्या मानधनातुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ती रक्कम वजा करुन घ्यावी.’ असे म्हणाला आहे.
यावेळी पैसे हा इतका मोठा मुद्दा असु नये असेही तो म्हणाला. कामरानच्या म्हणण्यानुसार आम्ही दोघे जेव्हा खेळायला सुरु करु तेव्हा आमचे मानधन हे पीसीबीकडुनच येत असते. तेव्हा पीसीबीने थोडी उदारता दाखवण्याची त्याने विंनती केली आहे. उमरेने त्याच्या कारकिर्दीत १६ कसोटीत १००३ धावा, १२१ वनडेत ३१९४ धावा आणि ८४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत १६९० धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- श्रीलंका दौऱ्यावर नसणार विराट-रोहित
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- ‘संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही, अन् सामना देखील वाचत नाही’
- खरं तर माझ्या वडिलांचा जीव कोरोना लसीमुळेचं वाचला ; अश्विनने सांगितला भावूक प्रसंग
- एक वेळ अशी येईल तो केवळ ‘मिस्टर ३६०’ म्हणुन सदैव स्मरणात राहिल, सेहवागकडुन एबीची स्तुती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
