Share

राज्यसभेच्या सीटसाठी ‘भगवंत मान’ यांच्याकडे लावतोय मस्का! कपिल शर्मा पुन्हा ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पंजाबच्या मुख्यमंत्री भगवंत मान यांचा शपशविधी नुकताच पार पडला. यावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच कपिल शर्माने देखील भगवंत मान यांच कौतुक करणारी पोस्ट केली होती. यावरून कपिल शर्मावर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. शहिद दिवसानिमित्तानं भगवंत मान यांनी भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन सुरु करण्यासंबंधी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला होता. त्या व्हिडिओचं कौतूक कपिल शर्मानं केलं आहे. त्यामुळे त्याच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण आलं आहे.

एका युझर्सनं लिहिलं आहे की, अचानक कपिलकडून भगवंत मान यांचं कौतूक होणं यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे. कपिल एवढ्या सहजासहजी कुणाचं कौतूक करणार नाही. आणखी दुसऱ्या एकानं लिहिलं आहे की, कपिलची पोस्ट म्हणजे आता त्याला राज्यसभेची सीट हवी असणार. त्यामुळे त्यानं अशाप्रकारे स्वताला प्रमोट करायला सुरुवात केली आहे. तो एकप्रकारे भगवंत मान यांना मस्का पॉलिशच करतो असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. त्यावर कपिलनं देखील ट्रोलर्सला जशास तसं उत्तर दिलं आहे.

कपिलनं त्या ट्रोलर्सला म्हटलं आहे की, आपण जे म्हणता आहात ते बरोबरच आहे. माझं एकच स्वप्न आहे. ते म्हणजे आपल्या देशाची प्रगती व्हायला हवी. तुमच्या नोकरीसाठी त्यांच्याकडे बोलू का? अशा शब्दात कपिलनं उत्तर दिले आहे. भगवंत मान यांनी देखील एक कॉमेडियन म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेजमध्ये भाग घेतला होता. त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. त्या कार्यक्रमाचे परीक्षक नवज्योत सिंग सिद्घु आणि शेखर सुमन हे होते. तर कपिल शर्मा हा तिसऱ्या शो विजेता होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!