मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच ‘दसवी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्यातील अभिषेकच्या अभिनयाची चर्चा होत आहे. अभिषेकला आजवर अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलंय. वडिलांकडून काहीच शिकला नाही, त्यांच्या तोडीचं काम करू शकला नाही अशा शब्दांत त्याच्यावर टीका झाली आहे. मात्र दसवीचा हा ट्रेलर पाहिल्यानंतर खुद्द अमिताभ बच्चन यांनी अप्रत्यक्षपणे टीकाकारांना सणसणीत उत्तर दिलंय आणि दुसरीकडे आपल्या मुलाच्या कामाचं कौतुक केलंय. वडील हरिवंश राय बच्चन यांच्या ओळी लिहित बिग बींनी अभिषेकला आपला उत्तराधिकारी असल्याचं म्हटलंय आहे.
माझी मुलं, मुलं असल्याने माझे उत्तराधिकारी नाही होणार, जे माझे उत्तराधिकारी असतील ती माझी मुलं असतील’, अशा आशयाच्या हरिवंश राय बच्चन यांनी लिहिलेल्या ओळी पोस्ट करत त्यांनी पुढे अभिषेकसाठी लिहिलं, ‘अभिषेक, तू माझा उत्तराधिकारी आहेस, बस कह दिया तो कह दिया’| या ट्विटमध्ये त्यांनी अभिषेकच्या दसवीचा ट्रेलरसुद्धा शेअर केला आहे. या चित्रपटात अभिषेकसोबत यामी गौतम आणि निम्रत कौर यांच्या मुख्य भूमिका आहेत. वडिलांच्या या ट्विटवर अभिषेकने लिहिलं, ‘लव्ह यू पा, नेहमीच’.
T 4230 – https://t.co/tTX69tWAc6
"मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे ;
जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे !"
~ हरिवंश राय बच्चनAbhishek तुम मेरे उत्तराधिकारी हो – बस कह दिया तो कह दिया !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 23, 2022
बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये अभिषेकबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. ‘पित्यासाठी सर्वात मोठा आनंद म्हणजे त्याच्या मुलांच्या कर्तृत्वाचा साक्षीदार होणं, त्यांचा गौरव होताना पाहणं. बाबूजींच्या वसियतनामा या कवितेतील या ओळींचं उदाहरण मी अनेकदा दिलं आहे आणि मी अभिमानाने सांगतो की अभिषेक हा माझा उत्तराधिकारी आहे. त्याचे सततचे प्रयत्न, विविध भूमिका साकारण्याचं त्याचं धाडस हे फक्त आव्हानच नाही तर सिनेमाच्या जगाला दाखवलेला आरसा आहे. जे लोक दुसऱ्यांवर टीका करतात आणि त्यांची खिल्ली उडवतात, त्यांच्यामध्येच स्वत:ला सिद्ध करण्याची क्षमता नसते,’ अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांना थेट उत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :


