औरंगाबाद : २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला. मात्र, खासदार असतानाही आणि आताही खैरेंचे औरंगाबाद महानगरपालिकेवर ‘विशेष’ लक्ष आहे. ही गोष्ट मनपा अधिकाऱ्यांसह नगरसेवकांना खटकत असे. पण समोर येऊन कोणीही बोलत नाही. परंतू आता खैरेंची ही गोष्ट भाजप खासदार भागवत कराड यांनी चव्हाट्यावर आणली आहे.
त्याचे झाले असे की, शहरातील एन-४ सी सेक्टरमधील विसावा शिशू उद्यानाचे सुशोभिकरण कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार अतुल सावे, माजी आमदार सुभाष झांबड, शिवेसना विधानसभा संघटक राजू वैद्य आदींची उपस्थिती होती. यावेळी खा.कराड यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोर खैरेंना टोला लगावला. कराड म्हणाले, ‘शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासारखी महापालिकेत आणि इतर कुठेही मी लुडबूड करीत नाही. मी खासदार आहे. त्यामुळे कोणती कामे कशी करायची याची मला जाण आहे’ अशी मिश्किल टिप्पणी कराड यांनी केली.
यावर शिवसेना विधानसभा संघटक राजू वैद्य यांनीही खा. कराड यांच्या टोलेबाजीला प्रत्युत्तर दिले. वैद्य म्हणाले, ‘खैरेंनी लुडबूड करण्याचा काहीही मुद्दा नाही. लोकांची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलावेच लागते. यात लुडबूडचा प्रश्न येतच नाही’ असे म्हणत खा. कराड यांना प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, एन-३, एन-४ या वॉर्डात भाजपने अनेक कामे केली आहेत. त्यामुळे येथील समस्याची मला जाण आहे. नागरिकांनी जी कामे निवेदनाद्वारे मागणी केली आहेत, ती पूर्ण करण्यात येतील असे आश्वासनही कराड यांनी यावेळी दिले.
महत्वाच्या बातम्या
- ‘ओ परबांनू मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका.. उगाच उद्या ‘इज्जत’ जावुक नको..!’
- ‘सरकारने शरियत कायद्यामध्ये हस्तक्षेप केल्याने करोना आणि चक्रीवादळांसारख्या आपत्ती आल्या’
- ‘लसीकरणाबाबत केंद्राची पॉलिसी स्पष्ट नाही; रोज नवीन नियमांची होतेय घोषणा’
- ‘ते ट्विट मी केलं नव्हतं तर…’ सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर महापौरांची सारवासारव
- ‘उद्धवजी… नाकाने कांदे सोलू नका… मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या’


