🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा:- लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणीला सुरुवात केली असून राजकीय दौरे, भेटीगाठी यासारख्या राजकीय घडामोडींना उधान आले आहे. तसेच निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्षांतर करत आहे. यातच राष्ट्रवादीचे घनसावंगीचे आमदार राजेश टोपे हे शिवसेनेत प्रवेश करणार या चर्चेला उधान आले होते.
परंतु राजेश टोपे यांनी या चर्चेना पूर्ण विराम दिला आहे.कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलताना ते म्हणाले की,जिल्ह्यात सध्या मी एका पक्षात जाणार असल्याची चर्चा मला दबक्या आवाजात ऐकू येत आहे. परंतु नैतिक,नीतिमत्तेच्या आधारावर मी येथेच राहणार आहे. काही कारणांसाठी काही जण इकडेतिकडे जात असतील, मी शरद पवार यांचाच कार्यकर्ता आहे असून मी कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याच्या सर्वसाधारण सभेला आ. टोपे, निसार देशमुख, मनोज मरकड, उत्तम पवार, सतीश टोपे, श्रीरंग पैठणे, संभाजी टोपे, किरण तारख, सतीश होंडे, बाबासाहेब बोबले यांची उपस्थिती होती. हेवेदावे विसरून कामाला लागावे असे आवाहन केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
