🕒 1 min read
अहमदाबाद : पहिला टी-२० सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आला. या टी 20 मालिकेतील सर्व म्हणजेच 5 सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरात क्रिकेट असोसिएशनने स्टेडियममध्ये फक्त 50 टक्के क्रिकेट चाहत्यांनाच परवानगी दिली आहे.
दरम्यान, कसोटी मालिकेत इंग्लंड संघावर दणदणीत विजय मिळाल्यानंतर इंग्लंड मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अवघ्या १२५ धावांचे माफक अव्हान इंग्लंड संघाने २ गडी गमावून लक्ष्य गाठल. सोळाव्या षटकातच इंग्लंडने विजयी लक्ष्य गाठलं.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच टी-२० सामन्यांत भारतीय संघाने नाणेफेक गमावली. इंग्लडने भारताला फलंदाजीसाठी पाचारण केल. सलामीवीर रोहितच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय फलंदाजी इंग्लंडच्या गोलंदाजी माऱ्यापुढं कोलमडली. हिटमॅन रोहित शर्माचा पहिल्या टी-२० सामन्यात समावेश नसल्याने चाहत्यांची मोठी निराशा झाली.
विराट कोहलीच्या या निर्णयावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि आक्रमक सलामीवीर विरेंद्र सेहवाग याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘क्रिकबझ’ शी बोलताना सेहवागनं ही नाराजी व्यक्त केली आहे. ‘रोहित शर्मा सुरुवातीच्या मॅच खेळणार नाही, असं विराटने सांगितलं आहे. भारताने पहिल्या दोन मॅच गमावल्या तर काय रणणिती बनेल? पराभावाने टीमला मोठा फरक पडतो. मी कॅप्टन असतो तर नक्कीच सर्वोत्तम 11 जणांना खेळवले असतं,’ असं सेहवागने सांगितलं.
‘रोहित शर्मा उलब्ध असेल तर तो नक्की खेळला पाहिजे. प्रेक्षक देखील रोहित सारख्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी येतात. मी देखील रोहित शर्माचा फॅन आहे. तो खेळत नसेल तर माझा टीव्ही बंद असेल. मॅच पाहावी वाटणार नाही,’ अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- दुसऱ्या बाळाची इच्छा व्यक्त करताच नवऱ्याने केलं अनफॉलो
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

