🕒 1 min read
अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे हे महाराष्ट्रात दौरा करत आहे. आज त्यांनी अहमदनगरमधील कोपर्डीला भेट दिली. कोपर्डी अत्याचार झालेल्या पीडित महिलेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी ते आले होते.
‘मी छत्रपती महाराजांचा वंशज आहे. त्यामुळे लोकांना मी वेठीस धरू शकत नाही. २००७ पासून मी मराठा समाजाच्या लढ्यात सहभागी आहे. हे कधी आंदोलनात आले हे मला माहिती नाही. मला कुणी शिकवण्याची गरज नाही. जर देवेंद्र फडणवीस यांनी काही सल्ला दिला तर मी त्यावेळी बोलेल’, असे म्हणत संभाजीराजे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सुनावले आहे.
‘सकाळपासून त्यांना संभाजीराजे दिसत आहे. ज्या प्रकारे सकाळी आरती लावतो तसं चंद्रकांत पाटलांचं झालं आहे. त्यांच्या मनात असं का येतंय हे मला माहिती नाही. मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे तेच याबद्दल सांगू शकतील. शिवरायांनीही कधी ज्योतिषींना मानले नव्हते. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे’, असा टोला पाटलांना लगावला.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा संभाजीराजेंवर निशाणा साधला होता. ‘संभाजीराजे यांनी मोर्चाची घोषणा केली होती. हे प्रसारमाध्यमांनी दाखवलं, वृत्तपत्रात आलं आहे. जर हे खोटं असेल तर त्यांनी त्यांनी प्रसारमाध्यमांवर खटला दाखल करावा. त्यांना वकिल लागले तर मी देण्यास तयार आहे. संभाजीराजे हे भाजपचे खासदार असल्याचे मान्य जर करत नसले तरीही ते ऑन पेपर भाजपचे खासदार आहे, अशी आठवणच पाटील यांनी करून दिली होती.
महत्वाच्या बातम्या
- तेव्हा पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल, म्हणून आम्ही स्वतंत्रच लढणार-नाना पटोले
- ‘बेईमानी झाकण्यासाठी गुलाम या शब्दाचा वापर’, सुधीर मुनगंटीवारांचे राऊतांना प्रत्युत्तर
- ‘कितीही रणनिती आखू द्या, २०२४ ला मोदीच येणार!’, फडणवीसांचा दावा
- ‘भाजपसोबत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली’, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
- ‘यांचे म्हणजे… नाचता येईना अंगण वाकडं!’, प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
