Share

‘माझ्या कारकीर्दीत मी नेहमीच असा कारनामा करण्याचा प्रयत्न केला पण…’ सेहवाग कडून पृथ्वी शॉचं कौतुक

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने कोलकाता नाइट रायडर्सचा ७ गडी राखुन दणदणीत विजय मिळवला. केकेआरने दिलेले १५५ धावांचे लक्ष्य दिल्लीच्या संघाने ३ गडी गमावत १७व्या षटकात सहज पार केले. धडाकेबाज अर्धशतकासाठी पृथ्वी शॉला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा एकटाच केकेआरवर भारी पडला.

या सामन्यात पृथ्वी शॉने पहिल्याच षटकात सलग ६ चौकार मारत केकेआरच्या गोलंदाजीची हवा काढुन घेतली. १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने संघाला शतकी सलामी दिली होती. शिखर धवन ४६ धावा करत बाद झाला तर, पृथ्वी शॉने अवघ्या ४१ चेंडूत ८२ धावांची खेळी केली होती. यात त्याने ११ चौकार आणि ३ षटकार लगावले होते. पृथ्वीच्या या खेळी नंतर माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागने त्याचे कौतुक केले आहे.

‘एका ओव्हरमध्ये सहा फोर मारायचे असतील कर तुम्हाला परफेक्ट गॅप काढावा लागतो. फिल्डर जाळ्यातून बॉलला सीमापार धाडावं लागतं. जे काम अजिबातच सोपं नसतं. माझ्या कारकीर्दीत मी नेहमीच असा कारनामा करण्याचा प्रयत्न केला पण एका ओव्हरमध्ये मी 18 ते 20 धावांपेक्षा अधिक धावा करु शकलो नाही, असं वीरेंद्र सेहवाग पृथ्वीच्या खेळीवर बोलताना म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!