Share

आयपीएलमध्ये आज हैदराबाद विरुद्ध दिल्ली; दुसरा विजय मिळवण्यास हैदराबाद उत्सुक

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : आयपीएलमध्ये चेन्नईत आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमने सामने येत आहेत. दिल्ली संघाने आतापर्यंत केवळ एका सामन्यात पराभव स्विकारला आहे. तर दुसरीकडे हैदराबाद संघाने केवळ एका सामन्यात विजय मिळवला आहे. तेव्हा आजच्या सामन्यात हैदराबादचा संघ दुसरा विजय मिळवतो का हे पाहणे उत्सुकतेचे राहील.

गुणतालीकते तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली संघाची आतापर्यंतची कामगीरी समाधानकारक राहिलेली आहे. यात प्रामुख्याने संघाचे सलामीवीर धवन-शॉ या जोडीने महत्वाची भूमिका निभावली आहे. तर गोलंदाजीत रबाडा अजुण विशेष चमक दाखवु शकला नाही. मात्र आजच्या सामन्यात अष्टपैलु अक्षर पटेलचे पुनरागमन होत असल्याने दिल्लीच्या गोलंदाजीची धार अजुनही जास्त तेज झाली आहे.

हैदराबाद संघाने या स्पर्धेत सलग तीन सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर चौथ्या सामन्यात विजय मिळवला. पहिल्या विजयानंतर हैदराबाद संघाचा अत्मविश्वास दुणावलेला आहे. केन विल्यिमसनच्या पुनरागमनामुळे हैदराबादच्या संघाचा मधल्या फळीचा प्रश्न सुटला आहे. तर नटराजनच्या स्पर्धेतुन बाहेर पडल्याने गोलंदाजीची धार कमी झाली आहे. त्याला बदली खेळाडू संघात सामील केला तर कोरोना नियमामुळे तो संघात सामील व्हायला किमान एक आठवडा लागतो. त्यामुळे हैदराबादच्या संघाची गोलंदाजी बाजु थोडीशी कमकुवत वाटत आहे. आजच्या सामन्यात दिल्लीचे शिलेदार भारी पडतात का हैदराबादचे शेर हे समजेलच.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!