कोल्हापूर : गेले काही महिने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. सध्याच्या स्थितीत निवडणूक घेण्यास सत्ताधारी गटाचा विरोध होता. मात्र, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने मात्र निवडणूक व्हावी अशी मागणी उचलून धरली होती. यांनतर, काही दिवसांपूर्वी गोकुळच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
२ मे रोजी निवडणूक पार पडणार असून जिल्ह्यातील आर्थिक केंद्र असलेल्या या दूधसंघावर सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी महाडिक-पी.एन पाटील गटाविरुद्ध शाहू विकास आघाडी असा सामना रंगणार असल्याने चुरस वाढली आहे. गेले वर्षभर लांबलेली निवडणूक २ मे रोजी होणार असतानाच पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा हाहाकार वाढत आहे.
गोकुळची सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी महाडिक-पी एन पाटील गटासह पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शाहू विकास आघाडीने देखील कंबर कसली आहे. यामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं असून आरोप-प्रत्यारोप देखील रंगत आहेत. ‘महाडिकांना गोकुळमधून लुटलेल्या पैशाची मस्ती आहे,’ अशी टीका सतेज पाटील यांनी केली आहे.
तर, ‘विनाकारण खालच्या पातळीवर टीका करू नका. महाडिक अजून सहीसलामत आहेत. चक्रव्युहाच्या बाहेर जायच आहे की नाही हे महाडिकच ठरवणार, त्यामुळे टीका करताना सांभाळून बोला,’ असं चोख प्रत्युत्तर महादेवराव महाडिक यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’
- फिट असूनही कोरोना होतो कसा ? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर
- मोठी बातमी : ‘राज्यात १८ वर्षांपुढील नागरिकांचे मोफत कोरोना लसीकरण करण्यावर एकमत’
- शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मेहबूब शेख यांच्या तक्रारीवरून २७ जणांवर गुन्हा
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे


