औरंगाबाद : कोरोना विषाणू शी संपूर्ण जग एका बाजूला लढते आहे, तर दुसऱ्या बाजूला कोरोना मुळे चक्क नवरा बायको मध्ये भांडणं झाली आहेत. ही भांडणं थेट पोलीस ठाण्यात पोचली आणि मग काय झालं? ते वाचा.
गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात कोरोना मुळे लॉक डाऊन केले आहे. काही वेळापुरते बाहेर पडण्याची परवानगी मिळते. पण नियमित बाहेर पडणाऱ्यांची मात्र यामुळे मोठी अडचण झाली आहे. त्यात जर तंबाखू गुटक्या सारखे व्यसन असेल तर हा लॉक डाऊन फारच कंटाळवाणा वाटतो आहे. 24 तास नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला सहन करणे अवघड झाले आहे. कौटुंबिक वादाचे अनेक प्रसंग यामुळे पोलिसांपर्यंत जात आहेत.
असाच एक किस्सा औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना सोडवावा लागला. आज दुपारी अचानक एक महिला धावतपळत पोलीस ठाण्यात दाखल झाली. तिने नवरा आपल्यावर संशय घेऊन मारहाण करीत असल्याची तक्रार केली. सध्या कोरोना चा बंदोबस्त असलेल्या पोलिसांनी सुरुवातीला तिच्याकडे दुर्लक्ष केले. पण पण ती जेव्हा घरी जायला तयार नव्हती. तेव्हा तिचे सविस्तर म्हणणे ऐकून तिच्या नवऱ्याला घरून बोलावून आणले. मग सुरू झाली असली कहानी. तो म्हंटला साहेब मी हिला सांगितलं तू कोरोना ची चाचणी करून घे. तिने नकार दिला, आमच्यात भांडण झालं.
साहेबांना विचारलं तिला चाचणी करून घ्यायला का सांगतो? तो म्हणला साहेब ही आजच मुंबईहून आली. तिला घरात घेण्यापूर्वी मी तपासणी करून घ्यायला सांगितले. माझं काय चुकलं?
या बदललेल्या परिस्थितीत त्याचं म्हणणं बरोबर होतं. पोलिसांनी तिला चढ्या आवाजात विचारलं हा म्हणतो ते खर आहे का? नाईलाजास्तव तिने मान हलवून मान्य केलं. पोलिसांचा प्रश्न होता एवढे लॉक डाउनलोड असताना तू मुंबईतून आलीच कशी?
हा प्रश्न विचारला पूर्वीच पोलीस निरीक्षक पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यांनी कोरोना चे नाव ऐकताच पोलीस व्हॅन पाठवून त्यांच्या घरातील सगळ्यांना उचलून आणले. ती महिला तिचा नवरा तिची मुलं या सगळ्यांना थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करून टाकलं.
कोरोना मुळे असे वेगवेगळे किस्से रोज घडत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

