Share

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला पोलिस कोठडी

Published On: 

औरंंगाबाद : माहेरहून घर खर्चासाठी पैसे आणण्याच्या कारणावरुन पतीकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून विवाहीतेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली होती. याप्रकरणी सातारा पोलिसांनी सोमनाथ मच्छिंद्रनाथ चव्हाण (वय ३०, रा. वळदगाव ता.जि. औरंगाबाद) याला बेड्या ठोकल्या असून त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एन. माने यांनी दिले आहेत.

या प्रकरणी मयत विवाहीता वैशाली चव्हाण हिचा भाऊ अमोल किसन कनसे (वय २४, रा. विटावा ता. गंगापुर) याने दिलेल्या तक्रारीनुसार सन २०१२ मध्ये वैशालीचा विवाह सोमनाथ चव्हाण याच्याशी झाला होता. त्यांना दोन आपत्य आहेत. सोमनाथ चव्हाण हा एमआयडीसी वाळुज येथील कंपनीत कामाला जात होता.

गेल्या काही वर्षापासून तो पत्नीला माहेराहुन घर खर्चासाठी पैसे आण म्हणून छळ करीत होता. नेहमीच्या छळाला कंटाळलेल्या वैशाली चव्हाण हिने शनिवारी राहते घरी आत्महत्या केली होती. या प्रकरणी विवाहीतेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!