Share

कर्जबाजारीपणामुळे पती-पत्नीची गोदावरीत उडी

Published On: 

औरंगाबाद : आर्थिक विवंचणा तसेच नैराश्याला वैतागून औरंगाबादच्या एका दांपत्यानी गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. औरंगाबाद- पुणे महामार्गावरील गंगापूर तालुक्यातील जूने कायगाव येथे ही घटना घडली. स्थानिक जीवरक्षक दलाच्या युवकांनी पाण्यात उडी घेऊन महिलेस सुखरूप पाण्यातून वाचवले. मात्र, पतीचा शोध लागला नाही.

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, औरंगाबाद पुणे महामार्गावरील गोदावरी नदीच्या नवीन पुलाखाली एक 30 वर्षीय महिला वाचवा वाचवा असे किंकळत मोठं मोठ्याने ओरडत होती. तिचा आवाज पुलावरील अनोळखी व्यक्तीने ऐकले. त्याने लगेच कायगाव येथील स्थानिक जीवरक्षक दलाचे बाळू चित्ते यांना संपर्क साधून कळविले. बाळू चित्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. नदीच्या पाण्यातील पाईपला महिला धरून बसली होती. माझ्या नवऱ्याला वाचवा असे ती वारंवार म्हणत होती. जीवरक्षक दलाने दीड तास पाण्यात बुड्या मारून सर्वत्र शोध घेतला. मात्र त्या व्यक्तीचा शोध लागला नाही.

घटनेने प्रचंड घाबरलेली महिला रात्रीच्या वेळी अधिक बोलण्याचा मनस्थितीत नव्हती. पोलिसांनी आधार कार्डच्या पत्त्यावर त्या महिलेच्या भावास बोलवून त्याच्यासोबत तिला घरी पाठवले. दरम्यान, पाण्यात बुडालेल्या त्या व्यक्तीचे नाव भागवत वैशिष्ट सावंत (रा.पाटोदा ता.औरंगाबाद) असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!