इंदूर : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
गेल्या 24 तासात देशात 4,01, 993 नव्या रुग्णांची भर पडली असून 3,523 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी देशात जवळपास तीन लाख रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्या आधी गुरुवारी देशात 3.86 लाख रुग्णांची भर पडली होती. कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जगभरातील एकाच दिवशी वाढणाऱ्या रुग्ण संख्येपैकी 40 टक्के रुग्णसंख्या ही एकट्या भारतात वाढत असल्याचं समोर आलं आहे.
अनेक नागरिकांना या महामारीत आपला जीव गमवावा लागत आहे. इंदूरमध्ये देखील अशीच हे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. इंदुर शहरातील दाम्पत्य मनीष आणि नेहा यांचा कोरोनामुळे निधन झाले झाले आहे. इंदुर शहरातील दाम्पत्य मनीष आणि नेहा यांचं २० नोव्हेंबर २००३ ला लग्न झालं होतं. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. १३ वर्ष दोघांनी संसार केल्यावर पतीने २०१६ मध्ये घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला. साधारण साडे चार वर्ष ही केस सुरू होती. पत्नीला घटस्फोट घ्यायचा नव्हता. त्यामुळे सतत काउन्सेलिंग झालं. अशात पुन्हा दोघांचा संसार सुरू होताना दिसत होता. मात्र, दोघांनाही कोरोना शिकार केलं आणि दोघांचाही त्यात मृत्यू झाला. अखेरच्या सुनावणीआधी दाम्पत्य पुन्हा सोबत जीवन जगण्यासाठी तयार झालं होतं. पण कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाला. हे धक्का पत्नी सहन करू शकली नाही. नंतर तिचाही मृत्यू झाला.
पत्नी नेहाने वकिल अमरसिंह राठोड यांच्या माध्यमातून घटस्फोट टाळण्यासाठी आपली बाजू मांडली होती. केस अखेरच्या टप्प्यात होती. अशात एप्रिलच्या सुरूवातीलाच मनीषला संक्रमण झालं. जे फुप्फुसात फार जास्त वाढलं होतं. नेहाने कशाचाही विचार न करता ती पतीकडे गेली. दरम्यान तिला सुद्धा कोरोनाची लागण झाली. १६ एप्रिलला मनिषचा आणि २० एप्रिलला नेहाचं निधन झालं. तिकडे फॅमिली कोर्टात फाइल उघडीच राहिली.
महत्वाच्या बातम्या
- राज्यातील पहिल्या महिला कंडक्टर सुनंदा कुंभार यांचं करोनाने निधन
- गुटख्याचा साठा करणारा गुन्हेशाखेच्या जाळ्यात
- चक्क पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी, सव्वा लाखांचा ऐवज लंपास
- गायरान जमिनीच्या वादातून तरुणाची गळा चिरुन हत्या, येसगाव शिवारातील घटना
- ‘महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे ६ हजार मे. टन डाळ राज्यात शिल्लक’


