औरंंगाबाद : गायरान जमिनीच्या वादातून पाच जणांनी तरुणांची गळा चिरुन हत्या केली. ही खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.३०) मध्यरात्री एकच्या सुमारास येसगाव शिवारातील गणपती गायरानमध्ये उघडकीस आली. कल्याण जायफुल्या पवार असे मृताचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल पवार, अनिस परदेशी चव्हाण, विमल परदेशी चव्हाण, केवल बंडू भोसले अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मारेक-यांची नावे असून त्यांचा साथीदार पमू बंडू भोसले हा पसार झाला आहे. जाहीरातीबाई जायफुल्या पवार (वय ६०, मुळ रा. पालम, जि. परभणी) ही पती व मुलांसह गणपती गायरान येथील दहा एकर सरकारी गायरान जमिनीवर शेती करते. गेल्या काही दिवसापासून शेतीच्या कारणावरून जाहीरातीबाई पवार आणि राहुल पवार यांच्यात वाद सुरू होता. या वादातूनच कल्याण पवार याचे दोन्ही पाय तोडून त्याचा गळा चिरून गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास हत्या करण्यात आली होती. तसेच त्याचा मृतदेह येसगाव शिवारातील गणपती गायरानमधील शेताजवळ असलेल्या कडुलिंबाच्या झाडाखाली फेकण्यात आला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सराफ, पोलिस निरीक्षक संदीप गुरमे आदींनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून राहुल पवार, अनिस परदेशी चव्हाण, विमल परदेशी चव्हाण, केवल बंडू भोसले या चौघांना ताब्यात घेतले. तर त्यांचा एक साथीदार पमू भोसले हा फरार झाला आहे. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप गुरमे करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्या कारकीर्दीत मी नेहमीच असा कारनामा करण्याचा प्रयत्न केला पण…’ सेहवाग कडून पृथ्वी शॉचं कौतुक
- ‘महाविकास आघाडीची शेतकऱ्यांच्या बांधावर बि – बियाणे योजना हवेत विरली’
- ‘बचपन के बिछडे आयपीएलमे मिले’ अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या ‘स्कूलमेट’
- एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही-पटोले
- मोठी बातमी : भारतातून ‘या’ देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

