Share

राज्यातील पहिल्या महिला कंडक्टर सुनंदा कुंभार यांचं करोनाने निधन

Published On: 

सोलापूर – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. विविध राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.सर्वसामान्य नागरिकांसह,अनेक नेते,खेळाडू,कलाकार कोरोनाच्या विळख्यात अडकून मृत्युमुखी पडत आहेत.

यातच आता राज्यातील पहिल्या बॅचच्या महिला एसटी कंडक्टर सुनंदा अशोक कुंभार यांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. 21 एप्रिलला सुनंदा यांनी आपली कोरोनाची चाचणी करून घेतली होती. त्यावेळी त्यांच्या चाचणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्या सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या. मात्र उपचारादरम्यान सुनंदा यांची वयाच्या 45 व्या वर्षी प्राणज्योत मालवली.

सुनंदा या नोव्हेंबर २००० पासून एसटीच्या सेवेत रुजू झाल्या होत्या. मनमिळाऊ स्वभाव आणि प्रवाशांना सेवा देण्यासाठीच्या तत्परतेमुळे त्यांनी सोलापूर विभागात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. ‘एसटी’त रुजू झाल्यापासून त्यांनी उस्मानाबाद, तुळजापूर, बार्शी आणि सोलापूर या ठिकाणी वाहक म्हणून सेवा बजावली.

सुनंदा कुंभार यांच्या पश्चात पती, तीन मुले आणि नणंद आहेत. त्यांनी केलेल्या सेवेबद्दल अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरव केला होता. दरम्यान, त्यांच्या मृत्यूची माहिती कर्मचाऱ्यांना कळताच कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!