औरंंगाबाद : अवैधरित्या विक्री करण्यासाठी आणलेल्या गुटख्याचा साठा करणा-यास गुन्हेशाखा पोलिसांनी जेरबंद केले. गुटख्याचा साठा करणा-याच्या ताब्यातून पोलिसांनी जवळपास ५५ हजार रूपये किंमतीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी शुक्रवारी (दि.३०) कळवली आहे.
संतोष खुशालचंद्र बडजाते (वय ४२, रा.सेरेनिटी अपार्टमेंन्ट, शांतीनाथ को-ऑपरेटीव्ह हौसींग सोसायटी, गारखेडा परिसर) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा करणा-याचे नाव आहे. गारखेडा परिसरातील शांतीन हौसींग सोसायटी येथे राहणा-या संतोष बडजाते याच्याकडे गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती.
गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न निरीक्षक एम.एफ.सिद्दीक्की, प्रशांत अजिंठेकर, पोलिस अंमलदार शिवाजी झिने, राजेंद्र साळुंके, विठ्ठल सुरे, संदीप सानप, प्रभाकर राऊत, अनिल थोरे, मोहिनी चिंचोळकर आदींच्या पथकाने छापा मारून बडजाते याच्या घरातून ५५ हजार रूपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला. चौकशीदरम्यान बडजाते याने सदरचा गुटखा बजाजनगर येथील हर्षल पाटणी याच्याकडून आणला असल्याचे सांगितले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्या कारकीर्दीत मी नेहमीच असा कारनामा करण्याचा प्रयत्न केला पण…’ सेहवाग कडून पृथ्वी शॉचं कौतुक
- ‘महाविकास आघाडीची शेतकऱ्यांच्या बांधावर बि – बियाणे योजना हवेत विरली’
- ‘बचपन के बिछडे आयपीएलमे मिले’ अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या ‘स्कूलमेट’
- एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही-पटोले
- मोठी बातमी : भारतातून ‘या’ देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

