मुंबई : भीषण तौक्ते चक्रीवादळ हे सोमवारी रात्री गुजरातच्या सौराष्ट्र किनाऱ्यावर धडकलं. यादरम्यान १८५ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वारे वाहत होते. तर महाराष्ट्रासह मुंबईतही या चक्रीवादळाने हाहाकार माजवला. तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरु आहे. तर महाराष्ट्रासह मुंबईतही या चक्रीवादळाने हाहाकार माजवला.
तौत्के चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिलाय. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात आणि संपूर्ण जिल्ह्यात वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 2 दिवसांचा दौरा करणार आहेत. उद्या आणि परवा असा 2 दिवस फडणवीसांचा पाहणी दौरा असणार आहे. त्यात उद्या ते रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करतील. तर परवा रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.
तसेच यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून राज्य सरकारकडे नुकसानग्रस्तांच्या मदतीची मागणी केली आहे. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तेव्हाही फडणवीसांनी कोकण दौरा करत नुकसानाची पाहणी केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकणाचा दौरा केला होता. तेव्हा ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केली होती. मात्र, ‘गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आल्यावर राज्य सरकारने जी मदत जाहीर केली, ती एकतर तोकडी होती आणि तीही मिळाली नाही. तौक्ते वादळानंतर नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने भक्कमपणे जनतेच्या पाठिशी उभे रहायला हवे!’, असं ट्वीट करत फडणवीस यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्तांच्या मदतीची मागणी केली आहे.
दरम्यान, आज राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मुंबईतील विविध किनारपट्टी ठिकाणांना भेट दिली. यावेळी त्यांनी मालाड-मढ, खारदांडा, माहिम व कुलाबा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व मच्छिमार बांधवांना दिलासा दिला. याबाबतची माहिती त्यांनी ट्वीट करून दिलेली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना काळातही औरंगाबाद मनपाच्या तिजोरीत आले तब्बल १७ कोटी!
- माणुसकीचा ‘विजय’! कोणीही जवळ नसलेल्या आजीला उचलून नेत केले दवाखान्यात दाखल
- मोठी बातमी! ‘औषध विक्रेते व पत्रकारांना कोविड योद्ध्यांचा दर्जा देणार’, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
- आंबेडकर म्हणाले ‘वणवण फिरू नका’; फडणवीसांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले..
- ‘..तेव्हा कोणत्या बिळात लोळत होतात?, पडळकरांचा काँग्रेसवर पलटवार


