औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात सर्वाधिक मृत्यू होत आहेत. या पार्श्वभूमीवर एक महिन्यापासुन शहरात लॉकडाऊनसदृश कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहरात संपूर्ण व्यवहार ठप्प आहेत. या परिस्थितीतही शहरात नविन आर्थिक वर्षात १ एप्रिल ते १७ मे या कालावधीत १४ कोटी २ लाख ७० हजार ६९४ रुपये एवढा कर जमा झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा हि रक्कम जास्त असल्याने मनपाला काही प्रमाणात दिलासा मिळतांना दिसत आहे.
यंदा एप्रिल महिन्यात मालमत्ता कराचा भरणा केल्यास त्यावर दहा टक्के, तर मे महिन्यात ८ टक्के सवलत देण्यात आली. आणि जून महिन्यात ६ टक्के सवलत दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मालमत्ताधारकांनी कर भरण्यास मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली आणि याच कारणामुळे करवसुली जोरात सुरु झाल्याची माहिती करनिर्धारक व संकलक अपर्णा थेटे यांनी ‘सांजवार्ता’ शी बोलतांना दिली. १ एप्रिल ते १७ मे पर्यंत १४ कोटी २ लाख ७० हजार ६९४ रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.
यात पाणीपट्टीचे ३ कोटी ८१ लाख २३२ रुपये कर जमा झाला आहे. त्यामुळे एकुण मालमत्ता व पाणीपट्टी मिळून १८ कोटींच्या वर कर मनपाकडे जमा झाला आहे. कोरोनामुळे गतवर्षी महापालिकेला कर वसूलीत मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनामुळे खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था आणि त्यातच निम्म्या प्रमाणात वसूली झाल्याने महापालिकेला नवीन आर्थिक वर्षात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू नये यासाठी यंदा मनपाने सुरुवातीपासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे. पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी यंदा सुरूवातीपासून मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी नियोजन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार नियोजन केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादेतील मराठी माध्यमांचे शाळा वर्ग बंद करण्यास मनसेचा विरोध
- माणुसकीचा ‘विजय’! कोणीही जवळ नसलेल्या आजीला उचलून नेत केले दवाखान्यात दाखल
- मोठी बातमी! ‘औषध विक्रेते व पत्रकारांना कोविड योद्ध्यांचा दर्जा देणार’, मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
- आंबेडकर म्हणाले ‘वणवण फिरू नका’; फडणवीसांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले..
- ‘..तेव्हा कोणत्या बिळात लोळत होतात?, पडळकरांचा काँग्रेसवर पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

