मुंबई : अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवतो आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहेत. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असेलल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतल्यामुळं त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सगळ्या गावांना बसलाय. त्यामुळे किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरून आतापर्यंत 6 हजार 540 नागरिकांनी सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे.
परंतु सध्या तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून पुढील काही तासांसाठी चक्रीवादळाचं केंद्र हे मुंबईपासून 160 किलोमीटरच्या आसपास समुद्रात आहे. दरम्यान बॉम्बे हाय तेलक्षेत्राजवळ बार्जवर २७३ जण अडकले आहेत, तर आणखी एका बार्जवर १३७ जण अडकले आहेत. अरबी समुद्रात चक्रीवादळ असल्यानं भीती व्यक्त करण्यात येतेय.अडकलेल्यांच्या सुटकेसाठी नौदलाच्या INS कोची आणि INS कोलकाता या युद्धनौका रवाना झाल्या आहेत. तसंच, INS तलवार सुद्धा बचावासाठी रवाना झाली असल्याची माहिती सध्या मिळाली आहे.
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, चक्रीवादळाचा प्रभाव मुंबई आणि किनारपट्टी भागावर राहणार, मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी कोसळणार, पुढच्या 24 तासात उत्तर कोकणात पाऊस, दक्षिण कोककणात ढगाळ वातावरण असेल, मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या काही ठिकाणी पाऊस कोसळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तयारी तिसऱ्या लाटेची! जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कोविड बाल रुग्णालय होणार सुरु
- ‘चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डाव, संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार’
- कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपासंदर्भातचा पेच सोडवण्यात यश आल्याचा जयंत पाटलांचा दावा
- मायकेल वॉनच्या टिकेवर सलमान बट्टने दिले ‘हे’ चोख प्रत्युत्तर
- तौत्के चक्रीवादळ; कामगार महिलेचा व्हिडिओ ‘तुफान’ व्हायरल, आनंद महिंद्रांनीही शेअर करत मनपाला दिला सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

