Share

मायकेल वॉनच्या टिकेवर सलमान बट्टने दिले ‘हे’ चोख प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन गेल्या काही काळापासून त्याने केलेल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत राहीला आहे. काही दिवसापुर्वी त्याने विराट कोहली आणि केन विल्यमसन यांची तुलना करत कोहलीवर टिका केली. तो म्हणाला की विराट कोहली केवळ लोकप्रियतेमुळेच श्रेष्ठ मानला जात आहे.

यानंतर मायकल वॉनवर अनेक स्तरातुन टिका झाली. यात एका नाव होते पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटु सलमान बटचे. सलमान बट्टने मायकल वॉनला उत्तर देताना म्हणाला होता की, ‘एकदिवसीय सामन्यात ज्याच्या नावावर एकही शतक नसलेल्या खेळाडूने ७० शतके केलेल्या फलंदाजाबद्दल बोलु नये.’ असा टोला लगावला. यावर मायकल वॉन त्याला प्रत्युत्तर देताना म्हणाला की, ‘तु अगदी बरोबर बोललास मात्र मी कधीही सामना निश्चीतीच्या प्रकरणात सहभागी नव्हतो काही खेळाडूमुळे’ असे जोरदार प्रत्युत्तर दिले.

आपल्या युट्युब चॅनेलवर बोलताना सलमान म्हणाला, ‘मी केवळ आकडेवारीबद्दल बोलत होतो, मात्र त्याने विषय दुसरीकडे नेला. याला काहीच आर्थ नव्हता. मात्र यामुळे सत्य बदलणार नाही. कोहली हाच सर्वश्रेष्ठ आहे त्याची तुलना कोणाशीही करणे शक्य नाही.’ असे सलमान म्हणाला. बट्टने वॉनच्या या टिकेला उत्तर देताना म्हणाला आहे की काही लोकांची मानसीक स्थिती चांगली नसते. त्यांच्या मनात केवळ वाईट गोष्टीचा संचार असतो. वॉनने चुकीच्या संदर्भ देत हा विषय निवडला आणि काहीच अर्थ नसलेली चर्चा घडवुन आणली. असे सलमान म्हणाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!