Share

मांजरा सिंचन क्षेत्रात शेतीचे प्रचंड नुकसान, पाणी सोडल्याची चौकशी करा- देवेंद्र फडणवीस

Published On: 

लातूर : भाजपा नेते व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मांजरा धरणाला इतके पाणी का सोडले याची चौकशी झाली पाहिजे असे यावेळी फडणवीस म्हणाले.

लातूर जिल्ह्यातील भुसणी या गावातील शेती शिवाराची देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. मांजरा धरणक्षेत्रात आलेल्या महापूरामुळे मोठ्याप्रमाणावर शेती खरडून गेली तसेच अनेक शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशी तक्रार यावेळी शेतकऱ्यांनी केली. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असे अश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

फडणवीस यावेळी म्हणाले, मुख्यमंत्री सोडा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी नुकसानीचा पाहणी दौरा केला नाही. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दौरा केला पाहिजे. हे सरकार विदर्भ मराठवाडा विरोधी सरकार आहे. पीकविमा सरकारची जबाबदारी आहे. कंपनीवर दबाव वाढवत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे असेही फडणवीस म्हणाले.

लातूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश आहे. तो सरकारने समजून घ्यावा. सरकार जर तातडीने मदत करणार नसेल तर आमचे एक आमदार कोर्टात गेले आहेत. आम्हाला अंगावर तर जावेच लागेल ना, असा इशाराही फडणवीसांनी यावेळी आघाडी सरकारला दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!